लोकनेते विद्यालयात राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

0
1259
Google search engine
Google search engine

नाशिक / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला.त्यात लासलगाव येथील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय व जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादित केले.राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती विभागात राज्यात चार विद्यार्थी तसेच जिल्हा ग्रामीण शिष्यवृत्ती विभागात अकरा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले .राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्तीत राज्यात सिध्दार्थ शिंदे (प्रथम),अनुराग शिंदे (दुसरा),अथर्व जाधव (तिसरा),अनिकेत शिंदे (सहावा),तसेच जिल्हा ग्रामीण शिष्यवृत्ती परीक्षेस समिक्षा खैरे , प्रसाद गांगुर्डे ,प्रणव गवळी ,श्रद्धा पाटील , तन्वी दगडे , सिद्धांत पांगूळ , श्रीरंग भावसार , मंजिल भामरे , शुभम कासार ,तनिषा कायस्थ , गितांजली शिंदे पात्र ठरले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील ,सचिव संजय पाटील , पं.स. सदस्य रंजना पाटील.निता पाटिल. कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील ,शंतनू पाटील, निता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी
प्राचार्या अनिता अहिरे ,पर्यवेक्षक बाबासाहेब गोसावी श्रीहरी शिंदे , रविंद्र पाटिल ,सोनाली वाणी , स्मीता क्षिरसागर ,विद्या कुळधरन , प्रतिभा डोंगरे , हेमंत अहिरे , सुर्यकांत गावित, विजय वाणी आदि उपस्थित होते.