सामाजिक कार्यकर्ते अधिक चन्ने यांची गरूड भरारी !!

0
1215
Google search engine
Google search engine

सांगली:: हेमंत व्यास :-

माणसाची ओळख नावाने होते आणि त्याच्या लेखणीच्या कर्तृत्ववाने ती वाचकांच्या स्मरणात राहते.लेखणीच्या कालपटावर आपली नाममुद्रा ठसविणारे अनेक असतील व आहेतही परंतु भारतीय पत्रकार संगठन दिल्ली न्युज नेटवर्कस च्या माध्यमातून महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वैशिष्ट्येपुर्ण घडामोडींचा आढावा घेणारे भारतीय पत्रकार संगठन दिल्ली न्युज नेटवर्कस चे महाराष्ट्राचे सर्वेसर्वा प्रमुख अधिक संपतराव चन्ने होय!

भारतीय पत्रकार संगठन दिल्ली न्युज नेटवर्कस चे महाराष्ट्राचे कर्तेसवरते अधिक चन्ने हे एक अलौकिक रसायनच आहे.अधिक चन्ने यांचे मुळ गाव हे कडेगांव लहानपणापासून समाज सेवा, सामाजिक कामांची आवड असणारे व ती अजुनही जपणारे व्यक्तीमत्व.घरची परिस्थिती जेमतेमच पण इच्छाशक्ती जबरदस्त आणि त्याचमुळे भारतीय पत्रकार संगठन दिल्ली न्युज समुहातील प्रतिनिधींना ते जेवढे जवळचे तेवढेच ते दुरच्या वाचकांना जीवाभावाचे वाटावेत अशी त्यांची किमया.परिस्थितीशी दोन हात करून दोन बोटे वर उरणारा महाराष्ट्राच्या भारतीय पत्रकार संगठन दिल्ली न्युज नेटवर्कसचा शिरोमणी म्हणजे अधिक. भारतीय पत्रकार संघटनांच्या माध्यमातून त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख सतत वर वर चढत राहीला महाराष्ट्राचे भारतीय पत्रकार संगठनचे प्रमुख पद भुषवुन त्यांनी प्रामाणिक पत्रकारीतेचा व स्वत: चा भरीवठसा महाराष्ट्रातील वाचकांच्यात उमटविला.समाजपरिवर्तनाचे प्रसारमाध्यम हे प्रभावी माध्यम आहे याची खुणगाठ बांधुन त्यांनी निर्भिड व निर्लोभी लेख लिहुन भरीव कामगिरी केली होती.याच सामाजिक कार्याची दखल राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने घेतली व त्यांना महाराष्ट्रातील असंघटीत कामगार समन्वयक समिती सुरक्षारक्षक विभागाची जबाबदारी खरगे साहेबांनी सोपवली.विविध क्षेत्रात कर्तृत्वाची दालन संपन्न करीत असताना अनेक दिग्गज राजकारणी,समाजकारणी धुरीणांशी अधिकचा निकटचा संबंध आला.समाजिक कामाची असणारी तळमळ,व गोरगरीबांचे सतत भेडसावणारे प्रश्न व समस्या निर्भिडपणे सोडवण्याची क्षमता असल्यामुळें वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांच्या छातीत धडकी भरेल एवढे कर्तृत्व अधिक चन्ने यांनी सिध्द करून दाखविले आहे.त्याच बरोबर भारतीय पत्रकार संगठन न्युज नेटवर्कस हेच सतिचवाण म्हणुन भारतीय पत्रकार संगठन न्युज दिल्ली चॅनलचे महाराष्ट्राचे प्रमुख म्हणुन जबाबदारी संभाळत आहेत.आत्मस्तुती हा दोष असेल पण स्तुती ही मनाची प्रेरणा असेल आणि म्हणुनच आपल्या निर्भिड लेखणीतुनच अधिक चन्ने यांचे व भारतीय पत्रकार संगठन न्युज नेटवर्कस चॅनल दिल्ली मा.संपादक पंकज गुप्ता सर परिवाराचे अवघे व्यक्तीमत्वच प्रेरणादायी आहे.आणि म्हणुनच भारतीय पत्रकार संगठन न्युजच्या बातम्या, लेख, फोटोग्राफी अधिक उठावदार असतात.शिवाय आपल्या टीमची सुध्दा नम्रता,सहनशिलता,कल्पकता, धैर्य,चिकाटी व कृतज्ञता या दैवी गुणांची लेखणी भारतीय पत्रकार संगठन च्या माध्यमातून अधिक चन्ने यांना बहाल केली आणि समाजपरिवर्तनाला महाराष्ट्रातील वाचकांना जी दुरदर्शी दिशा दिली ती प्रकाशमय झालीच नसती.परिवारातील प्रतिनिधींनी मा.अधिक संपत चन्ने यांचे सारखी लेखणी ,मुलाखती, फोटोग्राफी,पर्यटन माहीती, क्राईम स्टोरी, बातम्या,लेख इत्यादी विचाराचा वसा आणि वारसा भारतीय पत्रकार संगठन न्युजमधुन असाच अक्षुण्ण राहो हीच आमच्या सारख्या महाराष्ट्रातील सामान्य पत्रकाराची व तमाम वाचकांची अधिक चन्ने यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा!!

प्रांताध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या मान्यतेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काॅग्रेस प्रदेश कार्यकारिणीच्या राज्य समन्वयक सुरक्षारक्षक या पदावर नियुक्ती केल्याबद्दल मी बदरूज्जमा प्रदेश असंघटीत कामगार तसेच कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचे मी मनापासून आभार व्यक्त करीत असुन महाराष्ट्र काॅग्रेसपक्ष बळकट करण्यासाठी कामगार वर्ग व पक्षाचे कार्यकर्ते यांच्या मध्ये समन्वयक म्हणून जबाबदारी प्रामाणीकपणे पार पाडेन असे अधिक चन्ने यांनी सांगितले.