हाळम गावात रेशनच्या रॉकेल मध्ये पाणी मिसळणार्या दुकानदाराचे लायन्स रद्द करा/माधव मुंडे

0
847
Google search engine
Google search engine

परळी वैजनाथदि.08

तालुक्यातील मौजे हाळम गावात तहसील कार्यालया मार्फत रेशन वर वाटप करण्यात येत असलेल्या रॉकेलच्या टाकीमध्ये पाणी मिसळून वाटप होत असल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी हाळम गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी परळीच्या तहसील कार्यालयाकडे केली आहे. दरम्यान या गावच्या तलाठ्यांनी याप्रकरणाचा पंचनामा केला आहे. यावेळी टाकीतुन काढण्यात आलेल्या रॉकेल मध्ये पाणी असल्याचे निर्देशनास आले आहे. रॉकेल मध्ये पाणी असल्याचे तक्रार गावातील कांही जणांनी केल्यावरुन पंचनामा करण्यात आला आहे. अशी माहिती तलाठी घोडके यांनी दिली.
राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य माधव मुंडे म्हणाले की, हाळम गावात अनेक दिवसापासुन रेशन कार्डधारकांची गौरसोय होत आहे. हाळम गावात सर्वसामान्य ग्राहकांची बर्‍याच दिवसापासुन लुट चालु आहे. तर मागील कांही दिवसापुर्वी धान्य व रॉकेल वाटप न केल्याप्रकरणी दुकानदारावर कडक कारवाई करण्यात यावी. कारवाई न झाल्यास आम्ही ग्रामस्थ आंदोलनाचा पवित्रा स्विकारु आणि या पध्दतीने आता तलाठी मार्फत धान्य वाटप चालु आहे. यामध्ये जे अडथळा आणतील त्या दलालांना वेळीत प्रशासनाने पायबंदा घातला पाहिजे. यासाठी पोलिस प्रशासनाची गरजही पडेल. असेही माधव यांनी सांगितले.