डॉ. काळे यांनी केली नेत्र तपासणी
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )
चांदूर रेल्वे – धामणगांव मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार तथा अतुल विद्या मंदिर संस्थेचे सचिव प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्य शुक्रवारी (ता. १०) भव्य नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला रूग्णांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबीराचे उद्घाटन नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन वैद्यकिय अधिक्षक डॉ. मरसकोल्हे, नेत्रतज्ञ डॉ. आर. टी. काळे, डॉ. किरण काळे यांची उपस्थिती होती. या शिबीरामध्ये एकुण १५० रूग्णांची नेत्र तपासणी डॉ. आर. काळे व डॉ. किरण काळे यांनी केली. यामधील ९७ रूग्णांना नेत्र शस्त्रक्रियेकरीता पाठविण्यात आले. या शिबीरादरम्यान अतुल विद्या मंदिर संस्थेच्या अध्यक्षा सौ. उत्तराताई जगताप व परिक्षित जगताप यांनी रूग्णांच्या भेटी घेऊन विचारपुस केली.