लासलगाव येथील जिजामाता प्राथमिक शाळेची परिसर भेट संपन्न.

0
1534
Google search engine
Google search engine

नाशिक(प्रतिनिधी)

लाससगाव शिक्षण सहायक मंडळ लासलगाव संचलित जिजामाता प्राथमिक सेमी इंग्रजी डिजीटल शाळेची परिसर भेट आज दि.11/08/2018 रोजी संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौ.वैष्णवी पाटील व शाळेचे मुख्याध्यापक अनिस काझी यांच्या मार्गदर्शनाने आयोजीत करन्यात आली.लासलगावचे आराध्य ग्रामदैवत विंचूररोड येथील भगरीबाबा मंदिर, दत्तमंदिर, कोटमगावरोड बालाजीमंदिर येथे भेट देन्यात आली.सर्व विद्यार्थ्यांनी मंदिरात दर्शन घेतले.सहल प्रमुख राजाराम जाधव यांनी ग्रामदैवत भगरीबाबा यांच्या जीवन कार्याची माहिती सांगितली.दत्तमंदिरात विविध भजन मुलांकडुन म्हनुन घेन्यात आली.भगरीबाबा व दत्त दिगंबरांच्या नामघोषाने परिसर निनादुन गेला.त्यानंतर गोविंद संकुल परिसरातील शेतातील पिकांची पाहणी करून विद्यार्थांना मका व सोयाबिण पिकाची माहिती देन्यात आली.त्यानंतर कोटमगाव रोड येथील बालाजी नगरातील भक्तवत्सल बालाजी मंदिरास भेट दोन्यात आली.मंदिर परिसरीतील भव्य सभागृहात मुलांची आसन व्यवस्था करन्यात आली.बालाजी मंदिर समितीच्या वतीने ओमप्रकाश व्यास यांनी मंदिराची माहिती सांगितली.मंदिराच्यावतीने चालविन्यात येनारे बाल संस्कार केंद्र, दरवर्षी हजारो लोकांच्या उपस्थितीत साजरा करन्यात येनारा बालाजी भगवान ब्रम्ह महोत्सव व महाप्रसाद,विविध पुजाविधी यांची माहिती सांगितली.शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक विद्यार्थी प्रतिनिधी यांचे हस्ते भगवान बालाजीस पुष्पहार अर्पन करून दर्शन घेन्यात आले.मंदिर समितीच्यावतीने डॉ.श्रीनिवास दायमा, ठोंबरे मामा,प्रा.कैलास दायमा ,डॉ.संगिता सुराशे व मंदिर पुजारी यांचे वतीने प पंचायत समिती सदस्या सौ.रंजनाताई पाटील, सौ.निताताई पाटील,संस्थेच्या संचालिका सौ.पुष्पाताई दरेकर, संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौ.वैष्णवी पाटील यांचा श्रीफळ व पुष्प देवुन सत्कार करन्यात आला.सर्व विद्यार्थ्यानी दर्शनाचा लाभ घेतल्यानंतर सभागृहामदे संस्था व शाळेच्या वतीने विद्यार्थ्याना महाप्रसाद वाटप करन्यात आले.मंदिर समितीचे पदाधिकारी, संस्थेचे प्रतिनिधी व शिक्षकांनी प्रसाद वाटप करन्यात परिश्रम घेतले.या कार्यक्रम प्रसंगी बालाजी मंदिर ट्रस्ट चे पदाधिकारी डॉ.श्रीनिवास दायमा,विजय मुंदडा, ओमप्रकाश व्यास प्रा.कैलास दायमा,ठोंबरे मामा,विकास आहेर,भानुदास बकरे ,डॉ.संगिता सुराशे,संस्थेच्या संचालिका पुष्पाताई दरेकर,पं.स.सदस्या रंजनाताई पाटील, निताताई पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील उपस्थित होत्या. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिस काजी, उपशिक्षक कैलास भामरे,दिलीप शिरसाट,सुहास बच्छाव, समीर देवडे, राजाराम जाधव, केदुबाई गवळी, हर्षदा बच्छाव,योगीराज महाले,बद्रिप्रसाद वाबळे,बाळासाहेब वाजे या सर्वांनी सक्रीय सहभाग घेत परिसर भेट यशस्वी केली.शाळेने हा नाविन्यपुर्ण उपक्रम राबविल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, सचिव संजय पाटील, पुष्पाताई दरेकर,पं.स.सदस्या रंजनाताई पाटील, निताताई पाटील,संचालक शंतनु पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील यांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.मुख्याध्यापक अनिस काझी यांनी उपस्थितांचे आभार मानले.