शहराचे ह्रदयस्थळ असणाऱ्या सोनूचौकात वाहतूक पोलीस चौकीचे लोकार्पण*

0
1180
Google search engine
Google search engine

आकोट (संतोष विणके)-स्थानिक शिवाजी चौकात वाहतूक पोलीस चौकी कार्यनवीत केल्या नंतर अकोट शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सोनू चौकातील व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते भुमी चे सदस्य सुदाम राजदे व राजदे कुटुंबियांच्या मदतीने सोनू चौकातील वाहतूक पोलिसांसाठी पोलीस चौकी उपलाब्ध करून देत आज 15 ऑगस्ट च्या मुहूर्तावर या चौकीचे लोकार्पण करण्यात आले.उपविभागीय अधिकारी उदयसिंग राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे, तहसीलदार विश्वनाथ घुगे,नगर अध्यक्ष हरिभाऊ माकोडे, पोलिस निरीक्षक गजानन शेळके,नगर पालिकेचे कार्यकारी अधिकारी प्रशांत रोडे साहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड ह्यांची या लोकार्पण समारंभास प्रमुख उपस्थिती लाभली होती. ह्या वेळी सदर पोलिस चौकी तयार करून देणारे सोनू चौकातील व्यापारी सुदाम राजदे,त्यांचे बंधू मदन राजदे, जवाहर राजदे,हरीश राजदे, सोनू चौकातील व्यापारी,तसेच नगर सेवक मंगेश लोणकर, गजानन लोणकर, पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते हजर होते,सोनू चौकातील वाहतुकीचे नियंत्रण करण्या साठी सकाळी 9 ते रात्री 9 वाजे पर्यंत वाहतूक पोलीस तैनात असतात परंतु त्यांना चौकात थांबण्या साठी कोणताही निवारा नसल्याने, ऊन, पावसा पासून सौरक्षण होण्या साठी सोनू चौकातील व्यापाऱ्यांनी पोलीस विभागाला मदत म्हणून पोलिस चौकी तयार करून स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये त्याचे लोकार्पण करण्यात आले.सोनु चौक हा शहराचे ह्रदय स्थळ असल्याने तसेच या चौकातुन अनेक मिरवणुकांचा पॉइंट असल्याने याचौकीची नितांत गरज होती.या चौकी पाठोपाठ पालीकेने सोनु चौकाचे सौदर्यीकरण करावंअशी नागरीकांची मागणी आहे.