निमगाव वाकडा येथे कृषीदूतांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा

0
897
Google search engine
Google search engine

नाशिक :- उत्तम गिते

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय बाभूळगाव ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषिदूत नितिन माने, अतुल काकडे, अनिल साई, आशिष रामटेके, नंदलाल पवार, अजिंक्य शेलार, अमोल साबळे यांनी निमगाव येथील ग्रामपंचायत तसेच जि.प. प्राथमिक शाळेत ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिवस साजरा केला. यावेळी शाळेतील मुलांना कृषीदूताच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी सरपंच मधुकर गायकर, उपसरपंच लताबाई सोनवणे, तसेच मंदाकिनी गायकर,उज्वला गायकर,ज्ञानेश्वर गायकर संदीप गायकर,मयुर गायकर साहेबराव माळी, आणि ग्रामस्थ वर्ग आदी उपस्थित होते.
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी कृषीदूतांना डॉ. वाडीले,डॉ. पाटील, डॉ. दिनेश कुळधर, प्रा. राठोड, प्रा. नरोटे आदींचे मार्गदर्शन लाभले.