श्रीमंत भाग अशी ओळख असलेल्या पिंपळेसौदागर या परिसरातील शिवार चौकात ‘shivade i am sorry’ असा मजकूर लिहिलेले फलक आज सकाळपासून झळकत होते. हे फलक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. अखेर हे फलक लावणारा तरुण सापडला असून आपल्या प्रेयसीशी भांडण झाल्याने तिची माफी मागण्यासाठी 300 फलक लावल्याचे समोर आले आहे. त्याची प्रेयसी मुंबईहून पुण्याला येणार असल्याने त्याने फलक लावले होते. दरम्यान, बेकायदेशीर फलक लावल्यामुळे पालिका आता कारवाई करणार आहे.