माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे निधन

0
1255
Google search engine
Google search engine

निफाड प्रतिनिधी :- समाधान कोकाटे

नाशिकचे माजी खासदार राजाभाऊ पराशराम गोडसे यांचे वयांच्या 56 व्या वर्षी आज सायंकाळी उपचार सुरू असताना येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.अटलबिहारी वाजपेयी पहिल्यांदा १३ दिवसांचे पंतप्रधान झाले, त्या काळात राजाभाऊ गोडसे हे शिवसेनेतर्फे लोकसभेवर निवडून आले होते.गेल्या दोन महिन्यापासून त्यांची प्रकृती बरी नसल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यांची कारकीर्द सुरवातीला देवळाली कॅम्प शिवसेना, शहरप्रमुख, संसारी ग्रामपंचायत सरपंच, 12 वर्ष शिवसेना जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य एकलहरे गट तसेच खासदार असताना मंत्रालयात प्रमुख पदावर होते.