अकोट शहर पोलिसांची अवैध धंदे करणाऱ्यांवर विविध ठीकाणी धाड >< 11आरोपीसह 10.300 रु. मुद्देमाल जप्त

0
884
Google search engine
Google search engine

अकोट (प्रतीनीधी)- शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे नेतृत्वात सतत अवैध धंद्या विरुद्ध धाडसत्र सुरु असून, अवैध गुटखा, गोवंश मास,शस्र , देशी कट्टा असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असतांनाच आज दिनांक 23।8।18 रोजी पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी दोन पथकांद्वारे एकाच वेळेस शहरातील अवैध वरली मटक्यावर धाड सत्र राबवित 10 आरोपींना अटक करून त्यांचे कडून 9000 हजार रुपये व सट्टा पट्टी साहित्य जप्त केले,

पहिली रेड स्थानिक आशियाना बार, पुष्पक हॉटेल जवळ खुल्या जागेत सुरू असलेल्या वरली मटक्यावर रेड करून,१) दीपक विश्वनाथ चव्हाण रा सरस्वती नगर,२) सुरेश नारायण सुगंधी रा बळीराम चौक, ३) सलीम बेग तावक्कल बेग रा पोपटखेड, ह्यांना अटक केली. त्यांचे पासून सट्टा पट्टी साहित्य व 4150 रुपये जप्त केले, त्यानंतर आठवडी बाजारात रेड करून१) अशोक चंपालाल चांडक रा देवरी, २) प्रवीण प्रभूदास कोटक रा केशवराज वेताळ,3) सुनील रामनारायन मंत्री रा गांधी मैदान, ४) दिलीप वसंत शेंडे रा नंदीपेठ ह्यांना अटक करून त्यांचेकडून सट्टा पट्टी साहित्य व 3740 रुपये जप्त केले, तसेच तिसरी रेड ड्रीमलंड हॉटेल जवळील खुल्या जागेत करून१) राजू नारायण वगारे रा शनिवरा, २) सत्यपाल रामाजी गवई रा आडगाव खुर्द ह्यांना अटक करून त्यांचे कडून सट्टा पट्टी साहित्य व 700 रुपये जप्त केले तसेच श्रीनिवास सिनेमा गृहा जवळ रेड करीत १) निलेश दादाराव तेलगोटे ह्याला अटक करून त्याचे जवळून 510 रुपये जप्त करण्यात आले ह्याच सोबत पटेल कॉम्प्लेक्स जवळ दीपक गोपीचंद सुदेवाल रा दक्खनी फाईल ह्याचे वर रेड करून त्याचे ताब्यातून 20 बॉटल देशी दारू किंमत 1200 रुपये जप्त करण्यात आले असा एकूण 10,300रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर च्या रेड उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे ह्यांचे मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक गजानन शेळके, साहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड, पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गवई, गुन्हे शोध पथकाचे संजय घायल, विजय सोळंके, राकेश राठी, गुड्डू पठाण, जावेरीलाल जाधव ह्यांचे पथकाने केल्या,आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यावर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले.