लासलगाव येथील जिजामाता प्राथमिक शाळेत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव उत्साहात संपन्न.

0
1757
Google search engine
Google search engine

नाशिक(उत्तम गिते)

येथील लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित, जिजामाता प्राथमिक सेमी इंग्रजी डिजीटल शाळा,लासलगाव ता.निफाड जि.नासिक.
येथे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील यांचे संकल्पनेतुन व मुख्याध्यापक अनिस काझी यांचे मार्गदर्शनाखाली गोपाळकाला व दहिहंडी उत्सव संपन्न.या कार्यक्रमात शाळेतील इयत्ता 1 ली ते 4 थी च्या 100 हुन अधिक विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधा यांची वेशभुषा करून मनमुराद नाचन्याचा..गर्भा खेळन्याचा आनंद लुटला.एक तासाच्या कार्यक्रमानंतर दहिहंडी फोडली व सर्व मुलांना प्रसाद वाटप करन्यात आले.इयत्ता 4 थी तुकडी – अ ची विद्यार्थीनी देवयानी चव्हाणके हिने होर्मोनिअम वाजवुन मनमोहक सुमधुर गवळनी व हिंदी, मराठी गीते सादर करून सर्वांची मने जिंकुन घेतली.उपशिक्षक कैलास भामरे,सुहास बच्छाव,दिलीप शिरसाट, समीर देवेडे, राजाराम जाधव, केदुबाई गवळी, हर्षदा बच्छाव,योगीराज महाले,बद्रिप्रसाद वाबळे,बाळासाहेब वाजे या सर्वांनी सक्रीय सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केली.शाळेत हा नाविन्यपुर्ण उपक्रम राबविल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, सचिव संजय पाटील, संचालिका पुष्पाताई दरेकर,पं.स.सदस्या रंजनाताई पाटील, संचालिका निताताई पाटील,संचालक शंतनु पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील यांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.