मोर्शी येथील भारतीय महाविद्यालयात राष्ट्रिय एकात्मता कार्यशाळा उत्साहात संपन्न

0
840
Google search engine
Google search engine

महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती

रुपेश वाळके / विशेष प्रतिनिधी –

स्थानिक मोर्शी येथील भारतीय महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्र सेवा दल , पुणे यांच्या सयुक्त विद्यमानने एक दिवसीय एकात्मता कार्यशाळेचे व राष्ट्रीय सेवा पथकाचे उदघाटन सोहळा सपन्न झाला .

कार्यक्रमाचे उद्घाटन :- प्रा.डॉ. राजेश जी बुरंगे ( जिल्हा समन्वयक रा.से.यो. ) यांनी आपल्या उद्घाटन पर भाषणात रा. से .यो.विद्यार्थ्याना सविस्तार माार्गदर्शन करून राष्ट्रीय महत्व सांगीतले
कार्यक्रमाच्ये प्रमुख मार्गदर्शक- श्री अलाउद्दीन शेख(महा.कार्याध्यक्ष रा से द पुणे )यांनी “भारतीय बनुया आणि भारतीय म्हणुनच जगुया”या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करताना समाजातील विषमता,कलह,वर्ग संघर्ष,जातीवाद,धर्माधता,या सर्व समाजातील व राष्ट्रीय संकटावर मात करण्यासाठी मी हिंदू-मुस्लीम-शिख-इसाई नसून भारतीय आहे या प्राज्वल भावनेच्या निर्मातीची गरज व्यक्त केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्री जि एस मेश्राम (प्राचर्य भा म वी मोर्शी) यांनी स्त्रि -पुरूष समानता व राष्ट्र उभारनीत स्त्रियांचा बरोबरीने वाटा आहे असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्तावीक-सौ.कुमुदीनी कोरडे (सहसचीव सेवा दल पुणे यांनी केले. कार्यक्रमात प्रा. श्री.रा. भा. महाजन यांनी सुध्दा मार्मिक मार्गदर्शन करताना राष्ट्रीय एकात्मता ही काळाची गरज आहे हे सांगताना सेवा दलाच्या ऐतीहासीक कार्याचा उलघडा केला.कार्यक्रमाचे प्रमुख अथिती म्हनुन प्राचार्य श्री रा. भा. महाजन ( जेष्ठ सेवा दल सदस्य )श्री.अमोल आरोटे ( सेवा दल प्रशिक्षक पुणे) डॉ. बी.एस.चंदनकर (सदस्य महा.वि.वि.समीती भा.म.वि.मोर्शी) ,मा.श्री.दादाराव मडगे मोर्शी,मा.केशवराव कांडलकर उपस्थीत होत.

कार्यक्रमाचे संचालन डॉ.टेभूर्ने मॅडम यांनी तर आभार डॉ.एस.एम.राऊत यांनी मानेल.कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष-प्राचार्य रा.भा.महाजन तर प्रमूख मार्गदर्शक अमोल आरोटे तर प्रमुख अतीथी म्हनुन मा.श्री.अलाउद्दीन शेख ,प्राचार्य जी.एस.मेश्राम, सौ.कुमुदीनी कोरडे,दादारावजी मङघे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रांत मार्गदर्शन करतांना मा अमोल अरोटे यांनी राष्टीय एकात्मत गीत व् युवकाची राष्टीय एकात्मतेतिल भूमिका या अनुशगाने मार्गदर्शन केले मा.श्री.अलाउद्दीन शेख यांनी विद्यार्थाच्या समस्या ऐकुन त्याच्या प्रश्नाची उत्तरे देताना विद्याथ्यांसी मनमोकळा संवाद साधला . प्राचार्य श्री. रा . भा. महाजन सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रा.से.दलाच्या स्वातंत्र चळवळीतील योगदान तसेच सेवा दलाच्या शैक्षणीक सुधारनेेतील उभारलेला लढा यावर सर्वाचे लक्ष वेधले.शिक्षणाचे खाजगीकरण उदयाच्या शैक्षणिक खच्चीकरणा बाबतची धोक्याची घंटा आहे असे त्यानी नमुद केले .
कार्यक्रमा चे संचालन कु. शुभांगी खुजे (रासोंयो स्वयंसेवक)यानी केले, कार्यक्रमा चे प्रास्तविक डॅा. संदिप राऊत (कार्यक्रम अधिकारी, रा. से .यो .) तर आभार प्रा. घनश्याम दाणे यांनी मानले .
कार्यक्रमाला प्रा. खांडेकर , प्रा. बांबोळे , प्रा. टेभुर्णे,प्रा.काळे,प्रा.डॉ.रामटेके मॅडम , डॉ.देशमुख , डॉ.साबळे, डॉ.चिखले, प्रो वाहने , प्रा.दाणे व विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी होते