👉🏻चांदुर बाजार या ठिकाणी एच जी इन्फ्रा कंपनी चा मनमानी कारभार, 👉🏻कोणत्यानी प्रकारच्या पर्यावरणीय कायदेशीर बाबीची पूर्तता नाही

0
983
Google search engine
Google search engine

👉🏻चांदुर बाजार या ठिकाणी एच जी इन्फ्रा कंपनी चा मनमानी कारभार, 👉🏻कोणत्यानी प्रकारच्या पर्यावरणीय कायदेशीर बाबीची पूर्तता नाही

👉🏻.चांदुर बाजार येथील नगर सेवक गोपाल तिरमारे यांनी केली महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य कडे केली तक्रार दाखल.

चांदुर बाजार :-प्रतिनिधी

गल्ली पासून ते दिल्ली पर्यत मोठ्या प्रमाणात रोडचे बांधकाम सुरू असून या मध्ये केंद्रसरकर कडून कॉक्रीटीकरण या महत्व दिले असल्याचे दिसते.त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळकडून रेडी मिक्स कॉक्रीट प्रकल्प या साठी विविध विभागाची परवानगी घ्यावी लागते.शिवाय ग्रामपंचायत अबद्दलपूर ने सुद्धा या रेडी मिक्स कॉक्रीट ला तात्पुरती परवानगी दिली असल्याची माहिती आहे.
चांदुर बाजार तालुक्यात कॉक्रीट रोडचे बांधकाम जोरात सुरू असून ज्या ठिकाणी या रेडी मिक्स कॉक्रीट ची प्रकल्प उभा केला आहे त्या ठिकाणी कोठल्याही प्रकरणाच्या पर्यवरनिय बाबीबीची पूर्तता केली असल्याने मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण, जल प्रदूषण ,मृदा प्रदूषण होते असताना दिसून येते आहे.
या रेडी मिक्स कॉक्रीट प्रकल्प शेजारीची तालुका क्रीडा संकुल आहे त्यामुळे या ठिकाणी खेळण्यासाठी येणाऱ्या अनेक विद्यार्थी वर्ग याना याचा त्रास सहन करावा लागत आहे.तर या सर्व मुळे आरोग्यास मोठ्या प्रमाणवर धोका निर्माण झाला आहे.
चांदुर बाजार तालुक्यात सध्या सर्वात अधिक वाहनांची वर्दळ एच जी इन्फ्रा कंपनी ची पाहायला मिळत आहे.अतिशय वेगवान पद्धतीने याचे वाहन धावत असतात तसेच बांधकाम सुरू असलेल्या रोडवर पाणी सुद्धा मारले जात नसल्याने मोठ्या प्रमाणात धूळ ची वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना झाल्यावर याना जाग येणार का अशा प्रश्न देखील चर्चेचा विषय ठरत आहे.
तर या सर्व प्रकरणात तक्रार करून वरिष्ठ अधिकारी या पैकी एकही अधिकारी या ठिकाणी चौकशी करीत आले नसल्याने याना कोणत्या तरी मोठ्या राजकीय नेत्यांच्या पाठबळ असल्याचे नगर सेवक गोपाल तिरमारे यांनी माध्यमांशी शी बोलताना सांगितले.तसेच या वर लवकरात लवकर कार्यवाही किंवा चौकशी न झाल्यास वेळ प्रसंगी आंदोलन चा पवित्रा सुद्धा मी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.