येवला येथे गणपती उत्सव निमित्त सजीव देखावे.

665
जाहिरात

देखावे पाहण्यासाठी येवलेकरांची एकच गर्दी …………….

येवला/ प्रतिनिधी :- संतोष बटाव

येवला येथे गणपती उत्सव निमित्त मंडळांनी पौराणिक, ऐतिहासिक आणि काल्पनिक तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या विषयांना यावेळी देखाव्यात मंडळांनी स्थान दिले आहे. अनेक सार्वजनिक मंडळांनी आपल्या गणराया पुढे सजीव देखावे सादर केले. मंडळांनी यावेळी हलत्या देखाव्यापेक्षा सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे सजीव देखावे सादर केले. येवल्यातील मंडळांनी संत गोरा कुंभार, अंधश्रद्धा निर्मुलन, भीमाचे गर्वहरण, शिशुपाल वध असे जिवंत देखावे सादर केले.

येवला बॉईज या मंडळाने गोरा कुंभाराची विठ्ठल भक्ती याचा जिवंत देखावा सादर केला तर कासार युवा प्रतिष्ठाण या मंडळाने अंधश्रद्धा कशी वाढत चालली असून अंधश्रद्धावर विश्वास ठेवू नका असा संदेश देणारा सजीव देखावा सादर केला,शिवराजे ग्रुप या मंडळाने बलशाली भीमाचे गर्वहरण याचा सजीव देखावा सादर केला ,तर नवजवान मित्र मंडळाने शिशुपाल वध याचा जिवंत देखावा सादर केला. अशा अनेक मंडळांनी आपल्या गणरायापुढे सजीव देखावे सादर केले. ऐतिहासिक ,पौराणिक, प्रबोधनात्मक, काल्पनिक, सामाजिक सजीव देखावे पाहण्यासाठी येवलेकरांनी रात्री एकच गर्दी केली होती.

येवला/प्रतिनिधी :- संतोष बटाव
मो.9850576769

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।