आई

0
906
Google search engine
Google search engine

आई एवढी भाजी बनवलीय. शी.पण मिठ टाकायच कळत नाही.अस म्हणून तो भरलेल्या
ताटावरून उठला.आईच्या डोळ्यांत पाणी
आले.

माझ बाळ उपाशी.रात्रीच्या ११ वाजता आई
पुन्हास्वयंपाकाला लागली.१२ वाजेपर्यंत मुलांच्या आवडीची भाजी केली .त्याला झोपेतून उठवले.
जेवायला घातले.मगच त्या आईला झोप
आली.

काही दिवसांनी मुलगा काँलेजसाठी शहरात
आला. रूम केली. मेस लावली.आता तीन पातळ
कागदासारख्या चपात्या (पोळी) पाण्यासारखी
बेचव भाजी. रेशनिंग तांदळाचा भात. खाली मान
घालून खातो.

मेसला उशीर झाला तर उपाशी झोपतो.आता त्याला कळतंय आई ही आई असते.बापाने शिकवले. पैसा दिला. नोकरी लावली.तरी म्हणतो आमच्या
म्हाताऱ्याला अक्कल नाही.

लग्नासाठी मुलगी बघायला गेला. तिच्या
बापाने पहिला प्रश्न विचारला.तुला पगार किती?
तुझा बँक बँलन्स किती ? जन्म दात्याने कधी विचारलं
नाही आणि त्यानेही कधी सांगितले नाही.पण मुलगी दात्याने विचारलं.आणि ह्याने सांगितलं आता याला कळाले बाप हा बाप असतो.

पण अजूनही आम्हाला आमच्या आईबापाची
किंमत कळत नाही. त्यांच्याच नावाने आम्ही
शिव्या देतो.त्यांनाच आम्ही नावे ठेवतो.
चार फालतू पोरांत बापाची टर उडवतो.
आणि बाकीचे त्या बापावर खि खि करून
हसतात.खरं तर अशी मुल त्या
आईबापाची असू शकत
नाही.पण आज आईचा सल्ला
घ्यायला आम्हाला लाज वाटते. का ? लोक दुधखुळा
म्हणतील. त्या लोकांना सांगा.

जो दुधाचे उपकार जाणतो आणि त्याची परतफेड करण्यासाठी दुधखुळा होतो. तोच नादखुळा कतृत्व करून दाखवतो.फक्त आई वडीलांचा आदर करावा सारे जग जरी विरोधात गेले तरी कोणाची हिम्मत नाही तुम्हाला यशस्वी होण्यापासून अडविण्याची.फक्त आई बापाची किंमतकळली पाहिजे. जो आईबापाची किंमत करतो जग त्याला किंमत देते.

शब्दांकन :- यामिनी लोहार

संकलन :- उत्तम गिते