अकोटात आज बाप्पांना भावपूर्ण निरोप ;मुख्य मिरवणुकीत ४० मंडळांचा सहभाग

0
1102
अकोटात आज बाप्पांना भावपूर्ण निरोप ;मुख्य मिरवणुकीत ४० मंडळांचा सहभाग
अकोटात आज बाप्पांना भावपूर्ण निरोप ;मुख्य मिरवणुकीत ४० मंडळांचा सहभाग
Google search engine
Google search engine

श्रींच्या विसर्जनासाठी तगडा पोलिस बंदोबस्त

आकोट/संतोष विणके

अनंतचतुर्दशीला झालेल्या घरगुती गणेश विसर्जनानंतर आज अकोट शहरात सार्वजनिक मंडळातील बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे शहरात एकूण 67 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश स्थापना केली होती. यातील सुमारे 40 मंडळ ही मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.अकोट शहर हे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जात असल्याने विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरातील यात्रा चौक येथुन श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार असून नरसिंग मंदिर पटांगणातील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षीप्रमाणे मिरवणुकीच्या अग्रभागी असणार आहे.

डि जे वर प्रतिबंध असल्याने ब्रास बँड तथा बँजो पार्टींना विविध मंडळांकडून पसंती असल्याचे दिसत असून मिरवणुकीत अनेक मंडळांनी बाहेरगावच्या बँड पथकांना यावेळी पाचारण केले आहे.

असामाजिक तत्त्व व शांतता भंग करणार्‍यावर नजर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने २६ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.दारू पिणारे व मोठ्या आवाजात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यासाठी अनुक्रमे ब्रेथ अॅनालायझर व साउंड अॅनालायझर या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.गणेश विसर्जनासाठी सार्वजनिक मंडळे पोपेटखेड धरण व पूर्णा नदीवर आदी ठिकाणी जातात.

मिरवणूक वर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर,उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे,शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके,ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार मिलिंद बहाकार हे जातीने लक्ष ठेवून राहतील.

असा राहील बंदोबस्त

उपविभागीय पोलिस अधिकारी ०२ पोलीस निरीक्षक ०८ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक १६ एएसआय हेड कॉन्स्टेबल व पोलीस महिला कर्मचारी ३५० गृहरक्षक दलाचे जवान २५ त्या शिवाय एसआरपीचे ०२ तुकडी सीआरपी ०१ तुकडी व आरसीपी ०२ तुकडी मुख्यालय पोलीस एलसीबी तथा तालुक्यातील पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात राहणार आहे या शिवाय शहराच्या बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची नाकेबंदी करून तपासणी करण्यात येणार आहे.त्याच प्रमाणे सवदेशील भागा मध्ये या वर्षी वाच टॉवर ची संख्या वाढविण्यात आली आहे.

नियमाचे सर्वानी पालन करावे

न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वांनी पालन करावे ध्वनी मर्यादेबाबत कुठलीही सूट दिलेली नाही.डीजे वाजू शकत नाही तरी कृपया कुठल्याही अफवार विश्वास ठेवू नये. दिलेल्या नियमांचे सर्वांनीच पालन करावे पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.

गजानन शेळके,ठाणेदार शहर पो.स्टे.अकोट