योद्धा गणेश मंडळाने देखाव्यातुन साकरला बेटी बचाव बेटी पढावचा दिला संदेश

0
984
योद्धा गणेश मंडळाने देखाव्यातुन साकरला बेटी बचाव बेटी पढावचा दिला संदेश
योद्धा गणेश मंडळाने देखाव्यातुन साकरला बेटी बचाव बेटी पढावचा दिला संदेश
Google search engine
Google search engine

सांगली न्युज फ्लॅश

गणेशोत्सव हा हिंदु धर्मीयांचा एक महत्वाचा सार्वजनिक उत्सव आहे.भारतीय समाजात एकी असावी या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले.हिंदु धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता श्री गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते.दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव अनेक मंडळांनी विविध उपक्रम राबवुन साजरा करीत आहेत. कडेगांव मधील योद्धा गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी अथक परिश्रमाच्या जोरावर रात्रंदिवस मेहनत करून लाकडाचे अष्टकोनी मंदिर बनविले त्यावर कोरीव नक्षीकाम रूपेश पवार, आशिष सुतार,व संतोष चव्हाण यांनी केले त्याचबरोबर स्टेज देखावे व आरास मंडळाचे संस्थापक आप्पासाहेब चव्हाण, अंकुशराव वरूडकर,निलेश पवार,सौरभ भोसले यांनी केले.यावर्षी मंडळाने कोणतीही वर्गणी गोळा न करता कार्यर्त्यांनी स्वकष्टातुन साकारले आहे.झाडे लावा झाडें जगवा,वृक्ष संवर्धन,स्वच्छ परिसर,पाणी वाचवा,स्रीभ्रुणहत्या,पर्यावरण वाचवा,इत्यादी डिजिटल बोर्डची कमान गणपती समोर उभा करून समाजप्रबोधन करण्याचे काम या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.विशेष म्हणजे कोणाकडे वर्गणी गोळा न करता कार्यकर्त्यांच्या परिश्रमाच्या जोरावरच गेली दहा दिवस गणेशोत्सव दिमाखात साजरा केला.महाप्रसादाचे आयोजनही केले होते.हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.गणरायांची विसर्जन मिरवणूक डॉल्बीला फाटा देत पारंपारिक पद्धतीने ढोल ताशा पथकांच्या गजरात व गणरायाच्या जयघोषात कार्यकर्ते तल्लीन झाले होते.एकुणच ही विसर्जन मिरवणूक अतिशय उत्साहात पार पडली.यावेळी मंडळाचे संस्थापक,अध्यक्ष,सदस्य उपस्थित होते.