उपजिल्हाधिकाऱ्याने साडेतीन कोटी लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल

0
1938
Google search engine
Google search engine

अनिल चौधरी, पुणे

महाराष्ट्र  औद्योगिक महामंडळ (एम.आय.डी.सी.) वागळे इस्टेट,ठाणे येथील उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी ठाणे-२, संदिप जयवंतराव पवार वय-३५ वर्षे व एक खाजगी व्यक्ती शुक्ला यांच्याविरुद्ध तक्रारदाराकडे  ३,५०,००,०००/- (साडेतीन कोटी) रुपये लाचेची मागणी केल्यावरून वागळे पोलीस स्टेशन. ठाणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   याबाबत एसीबी ठाणे युनिटने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना एम.आय.डी.सी अंबरनाथ, ठाणे येथील दहा हजार चौ.मीटर चा प्लॉट मंजूर करण्यासाठी चार हजार प्रति चौ.मिटर प्रमाणे उपजिल्हाधिकारी संदीप पवार  व खाजगी व्यक्ती शुक्ला याने तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. त्यांच्यात झालेल्या  तडजोडी अंती लोकसेवक संदीप पवार व खाजगी व्यक्ती यांनी प्रति चौ.मिटर ३५०० प्रमाणे साडेतीन कोटी रुपये लाचेची मागणी केल्याबाबतची तक्रार , एका तक्रादाराने अँटी करप्शन ब्युरो , ठाणे यांच्याकडे नोंदविली होती.

        तक्रादाराने दिलेल्या तक्रारीची एसीबी ने पडताळणी केली असता, लोकसेवक व खाजगी व्यक्ती यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यावरून , एसीबी ठाणे यांनी उपजिल्हाधिकारी संदीप जयवंतराव पवार व खाजगी व्यक्ती शुक्ला यांच्याविरुद्ध लाचेची मागणी केल्यावरून भ्रष्टाचार प्रतिबंधक (संशोधन ) अधिनियम सन २०१८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

  शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबत अँटी करप्शन ब्युरो  यांच्या १०६४ या टोल फ्री  संपर्क साधण्याचे आवाहन एसीबी ने केले आहे.