रेल्वेतुन पडुन नागपुर येथील युवकाचा मृत्यु – चांदूर रेल्वे जवळील घटना

0
825
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान  ) 
    रेल्वेतुन पडल्याने नागपुर येथील ३४ वर्षीय युवकाचा मृत्यु झाल्याची घटना चांदूर रेल्वे जवळील रेल्वे ट्रॅकवर बुधवारी (ता. २४) पहाटे ५ वाजता उघडकीस आली आहे.
    नागपुर मधील जरीपटका येथील निवासी तथा खेळण्याचे व्यवसायी कपिल देव झामानी (३४) यांनी नागपुर येथुन बडनेरा पर्यंत मंगळवारी दुपारी २.४५ वाजता रेल्वेची तिकिट काढले होते. त्यानंतर रेल्वेने नागपुर येथुन बडनेरा येत असतांना राजना ते चांदूर रेल्वेच्या मधात रेल्वेतुन पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला, पायाला जबर मार लागून जागीच मृत्यु झाला. त्यांचा मृतदेह बुधवारी पहाटे ५ वाजता ट्रॅकमॅनला दिसला. त्यांनी याबाबत रेल्वे व चांदूर रेल्वे पोलीसांना माहिती दिली. चांदूर रेल्वे पोलीसांनी मृत्युची नोंद केली आहे. मृतक कपील कोणत्या ट्रेन ने बडनेरा येत होते व रेल्वेतुन कसे पडले याबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही. चांदूर रेल्वे येथील ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदन करून बुधवारी सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कपिल यांच्यामागे आई – वडिल, भाऊ, पत्नी, ६ वर्षांचा मुलगा असा आप्तपरिवार आहे.