वंचितांच्या आनंदासाठी सामाजिक जाणीव ठेवुन अकोट शहर पोलिसांनी साजरी केली अनोखी दिवाळी

0
1292
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणके

सामान्य जनता व अकोट सारख्या संवेदनशील शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी ह्या साठी 24 तास डोळ्यात तेल घालून सतर्क राहणाऱ्या अकोट शहर पोलिसांनी पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे नेतृत्वात विविध सामाजिक उपक्रम राबवून सामान्य जनतेच्या सेवेत राहून अभिनव पने दिवाळी साजरी केली.वंचितांच्या आनंदासाठी सामाजिक जाणीव ठेवुन अकोट शहर पोलिसांनी राबवलेल्या विविध उपक्रमाने एक नवीन संदेश दिला,

ह्या वर्षी अकोट शहर पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्या साठी विविध उपाययोजना केल्या त्या मुळे खरेदी साठी येणाऱ्या सामान्य नागरिक व व्यापारी ह्यांची ट्राफिक जाम पासून सुटका झाली,तसेच पोलिसांच्या कडक बंदोबस्त मुळे चोर पाकीट मार ह्यांच्यावर नियंत्रण दिसून आले .ह्या नियमित जबाबदारी शिवाय पोलिस स्टेशन अकोट चे पोलिस कर्मचारी सुरज चिंचोळकर ह्यांनी स्वतः गरीब स्रियां साठी स्वतः च्या दिवाळी खर्चा तुन पैसे वाचवून साडी वाटप केले , तसेच ट्राफिक कर्मचारी जगदीपसिंह ठाकूर, गणेश फोकमारे, अनिल लापूरकर ह्यांनी आजारी असहाय्य गरीब भिकाऱ्या ला आर्थिक मदत करून दवाखान्यात पाठविले.

एवढेच नव्हे तर स्थानिक सोनू चौकातून कबूतरी मैदाना कडे जाणाऱ्या मार्गावर सिमेंट च्या रपट्या च्या दोन्ही बाजूला मोठे खड्डे झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकाला अडचणींचा सामना करावा लागत होता ही अडचण लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी कदीर ठेकेदार ह्यांचे मदतीने सदर काम करून घेतल्याने भविष्यातील एखादा गंभीर अपघात टाळता आला, यामुळे सोनु चौकातुन माता मैदान कडे जाणारी वाहुतक खोळंबा न होता सुरळीत झाली.

यासर्वामुळे कायदा व सुवयवस्था चोख पणे सांभाळून अकोट शहर पोलिस करीत असलेल्या ह्या समाजउपयोगी कामा मुळे अकोट शहर पोलिसांची प्रतिमा सामान्य नागरिकां मध्ये उजळून निघत आहेत व नागरिक पोलिसांचे कौतुक करतांना दिसत आहेत.एकुणच आकोट शहर पोलीसांनी जनतेशी बांधलेली नाळ ही सामाजिक सलोखा साधण्यात कमालीची यशश्वी ठरत आहे असे दिसते आहे.