रस्सीखेच स्पर्धेत जय हनुमान संघ प्रथम

0
1944

रस्सीखेच स्पर्धेत जय हनुमान संघ प्रथम

रजनी साळवे/सोलापूर

दिपावली पाडव्याच्या निमित्त सालाबादप्रमाणे तांदुळवाडी (ता. माळशिरस) येथे रस्सीखेच स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत भाग घेतलेल्या वयस्कर लोकांचा उत्साह पाहुन शिट्या आणी आरोळ्यांच्या दणक्यात स्पर्धा पारपडल्या. या स्पर्धेत जय हनुमान संघाने प्रथम पारितोषिक मिळवले.तांदुळवाडी येथे दरवर्षी पुरूषांच्या रस्सीखेच स्पर्धा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येतात. यावर्षी स्पर्धेमध्येतालुक्यातील आठ संघांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांक आलेल्या जय हनुमान संघास कै. शाबाई बापूराव जगताप यांच्या स्मरणार्थ १ हजार १ रूपये, द्वितीय क्रमांक मिळवलेल्या कट्टर भगवा संघास कै. हणुमंत उघडे यांच्या स्मरणार्थ व्यंकटराव जगताप यांच्या हस्ते ७०१ रूपये तर तृतीय क्रमांक मिळवलेल्या जय सिध्दनाथ सघास जय हनुमान दुध संकलन केंद्राच्या दत्तात्रय कदम व हनुमंत निलटे यांच्याकडून ५०१ रूपये, चतुर्थ क्रमांक मिळवलेल्या टायगर गुप संघास कै. महादेव जरे यांच्या स्मरणार्थ वसंत जरे यांच्याकडून २०१ रूपये बक्षिस देण्यात आले. यावेळी हणुमंत निलटे, संभाजी जगताप, दत्तात्री कदम, बाबासाहेब मिले, श्रीराम जगताप, विजय मारे, वैभव जरे, जयप्रकाश जगताप उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दत्तात्रय कदम, संभाजी जगताप, दशरथ सुरवसे, दत्ता निलटे यांनी परिश्रम घेतले.