काजळी येथील वॉर्ड क्रमांक 2 मधील खड्डा झाला जीवघेणा ग्रामपंचायत काजळी चे दुर्लक्ष, प्रभारी ग्रामविकास अधिकारी मुळे गावाचा विकासाला खीळ

293
जाहिरात

काजळी येथील वॉर्ड क्रमांक 2 मधील खड्डा झाला जीवघेणा
ग्रामपंचायत काजळी चे दुर्लक्ष, प्रभारी ग्रामविकास अधिकारी मुळे गावाचा विकासाला खीळ

चांदुर बाजार:-प्रतिनिधी

काजळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 2 मधील मुख्य रस्त्याच्या मधोमध असलेला खड्डा जीवघेणा ठरत आहे.त्यामुळे एखादी हानी झाल्यास ग्रामपंचायत प्रशासन ला जाग येणार का? अशा प्रश्न स्थानिक रहिवासी करीत आहे.
काजळी ग्रामपंचायत ला प्रभारी ग्रामसेवक कार्यरत असल्याने ते फक्त आठवड्यात 2 दिवस काजळी ग्रामपंचायत मध्ये येतात त्यामुळे गावातील विकास खुंटला आहे.या आधी असणारे ग्रामविकास अधिकारी हे मुख्यालयीन राहत नव्हते. त्यामुळे गावातील अनेक विकासात्मक कामे रखडली आहे.त्याच्या बदली नंतर येणाऱ्या ग्रामविकास अधिकारी पूर्णवेळ काजळी ला देऊन गावाचा विकास करतील अशी चर्चा होती मात्र आठवड्या तील दोन दिवसात गावाचा काय विकास होणार असा प्रश्न चिन्ह आहे.

काजळी वॉर्ड क्रमांक 2 मधील मुख्य रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्डा जीवघेणा ठरत आहे.त्यामुळे जो पर्यत एखादी कोठल्याही प्रकारच्या हानी होत नाही तो पर्यत ग्रामपंचायत प्रशासन ला जाग येणार नसल्याचे दिसत आहे.तर याची माहिती असून देखील ग्राम विकास अधिकारी या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.आताग्राम विकास अधिकारीच गावाच्या विकासाला खीळ निर्माण करीत असल्याचे गावाचा विकास होणार तरी कसा असा प्रश्न आहे.तर वार्ड मधून निवडणू आलेले सदस्य याना याची जाणीव नाही का हा प्रश्न देखील तितक्याच महत्वाचे ठरते आहे.

ज्या ठिकाणी खड्डा झाला आहे तो रस्ता बऱ्यापैकी वर्दळीचा आहे.लहान लहान मुले या ठिकाणी येणे जाणे करीत असतात.बाजूला पिठाची गिरणी असल्याचे नागरिकांची देखील गर्दी पाहायला मिळते.तसेच महिला देखील या ठिकाणी असतात.मात्र ग्रामपंचायत च्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष पणा मुळे या ठिकाणी मोठ्या अपघात होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.त्यामुळे हा खड्डा कधी बुजवीला जाणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(फोटो मेल केला आहे.:-मुख्य रस्त्याच्या मधोमध असलेला हाच वॉर्ड क्रमांक 2 मधील तो खड्डा)

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।