श्रीराम मंदिर संस्थान शनवारा आकोट येथे काकड आरती समाप्ती निमित्त गोपालकाला

0
1214
Google search engine
Google search engine

आकोट/ प्रतिनिधी

स्थानिक श्रीराम मंदिर संस्थान शनवारा आकोट येथे काकड आरती व आषाढी एकादशी ते कार्तिक एकदशी तसेच कोजागिरी पोणिँँमा ते कार्तिक पोणिँँमेपर्यत दररोज पाहाटे.५ते ६.३०च्या दरम्यान काकड आरतीची समाप्ती व सांगता गोपालकाला ने करण्यात आली.
याप्रसंगी हभप सरोदे महाराज व हभप चंद्रकांत देशपांडे, श्रीनरसिंग महाराज हरिपाठ मंडळाच्या वतीने काल्याचे किर्तनाने गोपालकाला
कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आषाढी एकादशी ते कातिँकी एकादशी ला श्रीराम महिला भजनी मंडळ यांनी दरपंधरवाडी एकादशीला भजनाची सेवा दिली.
कोजागिरी पोणिँँमा ते कार्तिक पोणिँँमेपर्यत दररोज पाहाटे मंदिराच्या परिसरात महिलानी सहभागी घेतला.याउत्सवात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती.आज गोपालकाला सांगता प्रसादाचा अनेक भक्तांनी लाभ घेतला असे वामन जकाते यांनी कळवले आहे.