अट्टल घरफोड्याला पकडणाऱ्या रणरागिनींचा ठाणेदार गजानन शेळके नी केला सत्कार

3061

अकोट/ संतोष विणके

शहरात काही दिवसा पूर्वी घरफोडी करून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या घरफोड्याला दोन तरुणींनी धाडस दाखवून पकडले होते, त्या धाडसी दोन तरुणींचा आज अकोट शहरचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सत्कार केला.

दिनांक 10।11।18 चे सकाळी 4 वाजे दरम्यान अकोट शहरातील नया प्रेस भागातील विजेंद्र काकडे ह्यांचे घरी आजाबराव सखाराम गवई राहणार हातरुन पोलिस स्टेशन उरल ह्याने घराचा कुलूप तोडून घरफोडी करीत असतांना झालेल्या आवाजा मुळे शेजारी झोपलेल्या 2 तरुण मुली जाग्या झाल्या, त्या बाहेर आल्या असता एक चोर त्यांना घरातून बाहेर पळत असतांना दिसला, त्याला पाहून त्यांनी आरडा ओरड केला असता तो पळायला लागला, मुली त्याचे कडे पकडायला धावल्या असता तो बाजूच्या नाली मध्ये पडला, त्याला प्रतीक्षा नरेंद्र काकडे व तिची बहीण कोमल नरेंद्र काकडे ह्यांनी झडप घालून पकडले, काका विजेंद्र काकडे व गस्तीवरील पोलिस कर्मचारी विरेंद्र लाड व गोपाल बुंदे ह्यांनी सुद्धा त्यांना मदत केल्याने एक अट्टल घरफोड्या जेरबंद झाला त्या नंतर पोलिसांनी त्याचे कडून इतर घरफोडी तील मुद्देमाल सुद्धा जप्त केला,

पोलिस व नागरिकांनी सतर्कतेने एकमेकांना मदत केली तर गुन्हेगारी कृत्या वर नियंत्रण मिळविण्यात निश्चितपणे पोलिसांना मदत होते असे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सर्व अकोट वासीयांना आवाहन करून, कोमल व प्रतीक्षा सारखे धाडस सर्वांनी दाखवून जागृक नागरिकांचे कर्त्यव्य पार पाडणे आवश्यक आहे असे सांगून दोन्ही तरुणींचे अकोट शहर पोलिसांकडून आभार व्यक्त केले .ह्या वेळी मुलींचे काका विजेंद्र काकडे व मामा राजू सोळंके हे उपस्थित होते.

जाहिरात