नरसिंग महाराज यात्रा महोत्सवात भजन भारुडांचे धमाल प्रबोधन

0
1262
Google search engine
Google search engine

अकोट/ संतोष विणके

आकोट चे ग्रामदैवत संत नरसिंग महाराजांच्या यात्रेस दि.२४ नोव्हे.पासुन उत्साहात सुरुवात झाली असून यात्रा महोत्सवानिमित्त सुरू असणाऱ्या दैनंदिन कार्यक्रमांनी भाविक भक्तांचा आनंद फुलुन गेला आहे. यामध्ये यात्रेच्या पहिल्या दिवशी दिनांक 27 मंगळवार ला रात्री आठ वाजता गोंधळी भारुडाने धमाल रंगत आणली. भारूड ही लोककला विनोद माध्यमातून समाज प्रबोधनासाठी ओळखल्या जाते या अंतर्गत

भारूड सादर करणारे स्थानिक कलावंत गणेश महाराज गावंडे,अशोक गोंधळी,शिवहरी वानखडे,जगदीश गवई व त्यांच्या साथीदारांनी भारूड सादर करून संतांच्या समाजाचे विविध दाखले दिले. यावेळी भारुडात बुरगुंडा आनंदाचे विवेचन करत धमाल विनोदी प्रबोधन स्थानिकांना केले या भारुडाचा आनंद लुटण्यासाठी महिला तथा आबालवृद्धांनी तुफान गर्दी केली होती.विशेष म्हणजे संत नरसिंग महाराजांचे यात्रेनिमित्त दिनांक 5 डिसेंबर पर्यंत दररोज कीर्तन प्रवचन भजन हरिपाठ नामसंकीर्तन पार पडणार असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे संस्थांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.