कोंड येथे डाँ मेंढेकर यांच्या हस्ते गोवर – रुबेला लसीकरण मोहिम

0
983
Google search engine
Google search engine

कोंड येथे डाँ मेंढेकर यांच्या हस्ते गोवर – रुबेला लसीकरण मोहिम

उस्मानाबाद – उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथे आज दि .३ / १२ / २०१८ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंड येथे गोवर – रुबेला मोहिम राबविण्यात आली
उस्मानाबाद तालुका आरोग्य अधिकारी डाँ मेंढेकर यांच्या हस्ते आज गोवर-रुबेला लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने व इतर सर्व विभागाच्या मदतीने उस्मानाबाद तालुक्यातील प्रत्येक गावागावात नोव्हेंबर 2018 पासून मिझेल्स रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ही लस अत्यंत सुरक्षित असून या एका लसीमुळे मिझल्स व रुबेला या दोन महाभयंकर आजारापासून संरक्षण मिळणार आहे. ही लस आरोग्य विभागार्फत मोफत दिली जाणार आहे. या लसीकरण मोहिमेचा तालुका आरोग्य अधिकारी डाँ मेंढेकर यांच्या हस्ते कोंड येथे सोमवारी शुभारंभ करण्यात आला.यवेळी मा . तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मेंढेकर सर पंचायत समिती सदस्या मा.सौ. पद्मीनताई भोसले वैद्यकिय अधिकारी डॉ किशन लोमटे सर डॉ . फोलने सर, आरोग्य सहाय्यक श्री ए एच पठाण व टीममधील सर्व आरोग्य कर्मचारी, शाळेचे मुख्याध्याप व सर्व शिक्षक हजर होते.