गुरुवंदन सत्यशोधक संस्थेतर्फे संदीपपाल महाराजांना सत्यशोधक पुरस्कार प्रदान

413
जाहिरात

आकोट/ संतोष विणके

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५० पुण्यतिथी व कर्मयोगी गाडगेबाबा तसेच निसर्गवासि विश्वनाथ चिंचोलकार पुण्यस्मृति दीन निमित्त वकतृत्व स्पर्धा ,संकल्प शिबीर तथा सत्यशोधक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे ग्राम सिरसोली येथे दि.३ डिसे.ला पुण्यस्मृति दीन साजरा करण्यात आला या निमित्त रक्तदान ,अवयवदान ,देहदान तसेच नेत्रदान याविषयी वकतृत्व स्पर्धेचे आयोजन ही करण्यात आले होते.

कार्यक्रमाला
अध्यक्ष सप्तखंजेरीवादक श्री सत्यपाल महाराज ,तर प्रमुख पाहुणे रोटरी क्लब अकोट चे श्री नंदकुमार शेगोकार
श्री प्रेमकुमार बोके प्रवक्ता संभाजी ब्रिगेड,
श्री बरगट दादा ,खेड़कर दादा,श्री संदीपपाल महाराज श्री रामपाल महाराज ,ग्रामगीता जिवनगौरव पुरस्कारप्राप्त श्री गजानन चिंचोलकार, श्री हाडोळे,श्री बनसोड आदी उपस्थित होते.यावेळी श्री संदीपपाल महाराजांना गुरुवंदन संस्थेतर्फे या वार्षिचा गुरुवंदन सत्यशोधक पुरस्कार ,5000 रोख व सन्मान पत्र देऊन गौरविन्यात आले,

पुण्यस्मृती दिनानिमित्य आयोजित वत्कृत स्पर्धा पार पडुन विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
या स्पर्धेमधे सिरसोली मधील ज़ि•प•मराठी शाळा आणि उर्दू शाळा तसेच स्व बाबासाहेब खोटरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.।या स्पर्धेमधे
11 &12 1st वेदांत माकोड़े ,अकोट2nd अर्पण राजेश खापरकर3 rd मिथिल रमेश कुलथाने प्रोत्साहन पर योगेश मुकुंद कोरडे

8 व 10 गट
प्रथम कु कल्याणी श्रीकृष्ण अम्बुस्कार
द्वितीय शेख अनवर
तृतीय तोहिदशाह जमीर शाह
प्रोत्साहनपर कु शीतल इंगले 5 वी ते 7 वी
प्रथम तोहित सना तैय्यब शाह
द्वितीय सुप्रिया गणेश नेरकर
तृतीय किरण गेबड़
प्रोत्साहनपर संघमित्रा ठोसर या विद्द्यार्थ्यानी
प्रावीण्य प्राप्त केले वकतृत्व स्पर्धेचे
परीक्षक श्री सचिन महोकार श्री अक्षय पडोले कु काळे मैडम हे होते. तसेच संचालन सप्तखंजरी वादक ऋषिपाल अनासने
व आभार डॉ धर्मपाल यानी मानले.यावेळी कार्यक्रमाला बहुसंख्य गुरुदेवभक्त व गावकरी हजर होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।