आकोट न.पा.शाळातील सर्व वर्ग झाले डिजिटल…

0
686
Google search engine
Google search engine

१००% डिजिटल वर्ग असलेली एकमेव आकोट पालिका

आकोट/प्रतिनीधी
आकोट नगरपरिषद प्राथमिक व उच्य प्राथमिक अश्या १३ शाळांतील सर्व वर्गखोल्या डिजिटल झाल्या असून शिक्षकवृंदांनी एक पाऊल पुढे टाकत विद्यार्थांना ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.त्यासाठी शिक्षकांनी २५लाख रुपये स्वखर्च केला हे विशेष.

याअंतर्गत शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांकडून विविधांगी उपक्रम शाळेत राबविले जात असून त्या अंतर्गत शालेय मुलांना ज्ञानरचनावादी शैक्षणिक साधनासोबतच ई लर्निंग सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने नगरपरिषदेच्या सर्व शिक्षकवृंदांनी स्व खर्चातून आपआपला वर्ग डिजिटल करण्यास महत्वाची भूमिका पार पाडली आहे.त्यासाठी शिक्षकांनी अ रुपये खर्चकेला आहे हे उल्लेखनीय आहे.

नगराध्यक्ष ,शिक्षण सभापती यांच्यासह मुख्यअधिकारी प्रशांत रोडे,प्रशासन अधिकारी नंदकिशोर हिंगणकर यांचे प्रेरणेने नगरपरिषदेच्या शिक्षक वृंदांनी डिजिटल शाळेचे १००% उद्दिष्ट पुर्ण केले आहे.या माध्यमातून दिशा अॕपसह विविध माध्यमातून अभ्यासक्रम पुर्ण करीत अध्ययन अनुभव घेत मुले शिकायला लागली आहेत.मुलांमध्ये त्यामुळे शिकण्याची गोडी व आनंद निर्माण झाला आहे .पालकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे

शिक्षकवृंद अभिनंदनास पात्र
प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हा ध्यास घेवून नगरपरिषदेचे शिक्षकवृंद महत्वाची भूमिका पार पाडत आहेत.१००%डिजिटल वर्गखोल्या झाल्याने मुलांना नवतंत्रज्ञायुक्त शिक्षण मिळत आहे.माझे सर्व शिक्षक अभिनंदनास पात्र ठरले आहे अशी प्रतिक्रिया नगरपरिषदेच्या शिक्षण सभापती यांनी व्यक्त करुन शिक्षकवृंदांचे कौतुक केले आहे.

शाळांची गुणवत्ता वाढली आहे.
नगरपरिषद शाळांमध्ये ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती व डिजिटलायजेशनसह विविधांगी शैक्षणिक उपक्रम राबविल्यामुळे शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढली आहे.तेराही शाळांतील सर्व वर्गखोल्या डिजिटल करण्यासाठी शिक्षकांनी स्वतः खर्च करुन हे उद्दिष्ट पुर्ण केले.राज्यात १००% डिजिटल वर्गखोल्या असलेली ही बहुदा एकमेव नगरपरिषद असावी .हा बहुमान मिळवून देणा-या मुख्याध्यापक व शिक्षक यांना श्रेय आहे. असे नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी नंदकिशोर हिंगणकर यांनी सांगितले आहे.
————————-