नौटंकीबाज अकोला जिल्हाधिकाऱ्यांचा आकोटात पत्रकारांनी केला निषेध

1023

जिल्हाधीकारींच्या उद्दामपना विरुद्ध पत्रकारांची एकजुट

आकोट/ प्रतीनिधी :-

लोकशाहीचा महत्वपूर्ण घटक असलेल्या वृत्तपत्र संपादक, पत्रकार यांचा आपल्या निवासस्थानी बोलावून अपमान करुन उद्दामपणा करणार्‍या, प्रसिध्दीसाठी हपापलेल्या नौटंकीबाज जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचा आकोट शहर वा तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. स्थानिक शिवाजी पार्क मध्ये विविध पत्रकार संघटनांच्या वतीने 2 जानेवारी रोजी निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.

अकोला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी अकोला येथील विविध वृत्तपत्रांच्या संपादक, पत्रकारांना चहापानाकरिता निवासस्थानी निमंत्रीत केले होते. मोर्णा महोत्सवाची त्यांना अपेक्षीत असलेली प्रसिध्दी न झाल्याने त्यांनी पत्रकारांना उद्दामपणाची वागणुक दिली. दुषित पाणी प्यायला दिले, वृत्तपत्रांची फेकफाक केली, जबाबदार अधिकार्‍याने पत्रकारांना दिलेल्या या अपमानास्पद वागणुक व उद्दामपणाचा अकोटात तिव्र शब्दात निषेध करण्यात आला. या निषेध सभेमध्ये आकोट शहर व ग्रामीण भागातील आकोट तालुका पत्रकार संघ, अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ, बहुजन पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आदी संघटनांचे पत्रकार एकत्रित आले होते.

यावेळी पत्रकारांनी जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई करावी,अशी मागणी केली. तसेच आकोट येथील पत्रकारांनी वृत्तपत्रांमध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यक्रमांचे वृत्तांकन करु नये आदी अनेक निर्णय यावेळी घेण्यात आले. याप्रसंगी उपस्थित पत्रकारांनी मनोगत व्यक्त करुन या प्रकाराचा तिव्र निषेध नोंदविला.

याप्रसंगी पत्रकार हरिओम व्यास, रामदास काळे, कमलकिशोर भगत, जगन्नाथ कोंडे, विठ्ठलराव गुजरकर, मंगेश लोणकर, मुकूंद कोरडे, किरण भडंग, सोनु सावजी, लकी इंगळे, संतोष विणके, सारंग कराळे, प्रशांत महल्ले, गोपाल नारे, राहुल कुलट, प्रकाश गायकी, विनोद राठोड, अकबर खान, तुषार अढाऊ, मनोहर गोलाईत, प्रमोद सावरकर, अनिल वगारे, शे.अहेमद शे.बब्बु, निलेश झाडे, स्वप्निल सरकटे, विजय भगत, सै.नुर सै.उस्मान, कुशल भगत, कमलेश राठी आदीसह पत्रकार उपस्थित होते.

जाहिरात