महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी बाळापूर पोलिसांनी लावले वाहनांवर रिफ्लेक्टर

0
685
Google search engine
Google search engine

आकोला/प्रतीनीधी

महामार्गावरील सातत्याने होणारे अपघात टाळता यावेत तसेच अपघातापासुन बचावाची जनजागृती व्हावी म्हणुन बाळापूर पोलिसांनी विशेष मोहीमें अतर्गत वाहनांवर रिफ्लेक्टर लावलेत.
बाळापुर पोलीस स्टेशनच्या हद्दी मधून धुळे कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व हैद्राबाद राज्य महामार्ग जातात, दोन्ही महत्वाच्या महामार्गावर दररोज हजारो वाहने धावतात, बऱ्याच वेळेस रात्री अंधार असल्याने व वाहनावर मागील बाजूस पार्किंग लाईट किंवा रेफलेक्टर लावलेले नसल्याने रस्त्यावर थांबलेल्या किंवा नादुरुस्त वाहनावर दुसरे वेगाने धावणारे वाहन धडकून मोठे अपघात झालेले आहेत.

, हे अपघात टाळता यावे व ह्या अपघातातून होणारी जीवित व वित्तहानी टळावी म्हणून आज बाळापूर हद्दीतील महामार्गावर पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी रेफलेक्टर लावण्याची मोहीम राबविली, ह्या मोहिमे दरम्यान शेकडो वाहनावर रेफलेक्टर लावण्यात आलेत, सदर मोहिमेत पोलिस उप निरीक्षक विठ्ठल वाणी, साहाय्यक पोलिस उप निरीक्षक सुरेंद्र जोशी, जयवंत शिंदे, कॉन्स्टेबल गिरीश वीर, हर्षल श्रीवास ह्यांनी भाग घेतला.