उस्मानाबादेत किरकोळ कारणावरून हाणामारी

525

उस्मानाबाद येथे किरकोळ कारणावरून हाणामारी


उस्मानाबाद / पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :- दिनांक 12/01/19 रोजी 10.15 वा. प्रतापसिंह विजयसिंह पाटील रा.कारी ता.बार्शी जि.सोलापूर हे बार्शी नाका उस्मानाबाद येथील आदित्य पेट्रोलपंप येथे मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरण्याकरिता गेले असता पंपावर गर्दी असल्याने प्रतापसिंह विजयसिंह पाटील हे लाईनने पंपा पर्यंत गेले असता आदित्य पेट्रोल पंपावरील प्रकाश बजरंग मिसाळ याने मध्येच आलेल्या दुसऱ्या मोटारसायकल मध्ये पेट्रोल टाकत असल्याने प्रकाश मिसाळ यास प्रतापसिंह विजयसिंह पाटील हे मी येथे लाईनने येऊन थांबलो आहे तु बिगर लाईनचे लोकांना पेट्रोल का टाकतो असे म्हणाले असता प्रकाश बजरंग मिसाळ याने प्रतापसिंह विजयसिंह पाटील यांना तु कोण विचारणार तुझी गाडी बाजुला घे असे म्हणून शिवीगाळ केली व ढकलून दिले म्हणून प्रतापसिंह विजयसिंह पाटील यांचे डोक्यास मार लागून जखम झाली आहे. म्हणून प्रतापसिंह विजयसिंह पाटील यांचे फिर्यादवरून प्रकाश बजरंग मिसाळ याचेविरुध्द दिनांक 12/01/2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 324,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This Post was Protected by Vidarbha24News © Copyright 2018, All Rights Reserved

जाहिरात