नवचैतंन्य सेवाभावी संस्थेच्या वतीने राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती संपन्न.

729

आकोट/ प्रतीनीधी

स्थानिक नवचैतंन्य बहुऊद्देशिय सेवाभावी संस्था अकोट यांच्या वतिने आज दि12 जाने रोजी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामीविवेकानंद जयंती निमीत्य राष्ट्रिय युवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पत्रकार रमेश तेलगोटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हनुण राजेद्र पाटील सर होते तसेच लोकप्रबोधनकार श्री भिकाजी भारती हे सुध्दा उपस्थीत होते कार्यक्रमाची सुरवात जिजामातेच्या वंदन गीताने करण्यात आली.

यावेळी रमेश तेलगोटे यांनी तरुणांच्या बदलत्या दृष्टीकोनावर विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे अध्यक्ष राहुल खंडारे यांनी केले तर आभार सचिव नितीन तेलगोटे यांनी माडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल तेलगोटे,सुरेश गवारगुरू,विजय भोजने,विशाल तेलगोटे,प्रविण उगले,राहुल तेलगोटे,अक्षय काळे, धिरज तेलगोटे यांचे सहाकार्य लाभलेअसे आयोजकांनी कळवले आहे.

जाहिरात