**ताकारी योजनेचे देवराष्ट्रे येथे असणारे तांत्रिक कार्यालय सांगली येथे स्थलांतर केले आहे ते रद्द करावे : अँड. प्रमोद पाटील*

Google search engine
Google search engine

ताकारी योजनेचे देवराष्ट्रे ता. कडेगाव येथे असणारे तांत्रिक कार्यालय सांगली येथे 1 महिन्यापुर्वी स्थलांतर केले आहे ते रद्द करावे अश्या मागणीचे निवेदन मा. कार्यकारी अभियंता, ताकारी उपसा जलसिंचन योजना शाखा कार्यालय देवराष्ट्रे श्री पाटील साहेब यांना अँड. प्रमोद पाटील, श्री. धोंडीराम महिंद, श्री. वैभव पवार, आनंदा कुरळे, निवृत्ती होनमाने व इतर शेतकरी यांनी दिले.ताकारी उपसा जलसिंचन योजना गेले कित्येक वर्षापासुन सुरू असून त्याची बहुतांश कार्यालये ही मौजे देवराष्ट्रे येथे सुरू आहेत. त्यापैकी एक तांत्रिक कार्यालय आहे. तांत्रिक कार्यालयामार्फत टप्पा क्रमांक 2, टप्पा क्रमांक 3, व सोनसळ डावा कालवा येथील सर्व मोटार तसेच मशिनरी, इलेक्ट्रिक साहित्य यांची देखभाल व दुरुस्ती केली जाते. तांत्रिक कार्यालय हे एक महिन्यापुर्वी सांगली येथील अधिकार्‍यांनी त्यांचे सोयीसाठी सांगली ला नेले आहे त्यामुळे कडेगाव तालुक्यात ताकारी योजनेच्या पाण्याचे योग्य नियोजन होऊ शकत नाही व मोटार चा अगर मशिनरी चा काय प्रॉब्लेम झाला तर लवकर दुरुस्ती होऊ शकत नाही. तसेच लोकांना विनाकारण सांगली ला जावे लागत आहे त्यामुळे लोकांची गैरसोय झालेली आहे. सरकार शेतकऱ्यांचे कडून एकरी 7500 रुपये पाणीपट्टी वसुल करतेय. व लोकांची गैरसोय का करतेय असा प्रश्न पडला आहे.त्यामुळे ताकारी योजनेच्या तांत्रिक विभाग कार्यालय चे सांगली येथे केलेले स्थलांतर रद्द करावे व पुन्हा ताबडतोब पूर्वीच्याच ठिकाणी देवराष्ट्रे येथे सुरू करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.यावेळी मार्केट कमिटी संचालक श्री. धोंडीराम महिंद, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. वैभव पवार, आनंदा कुरळे, संतोष लोहार, निवृत्ती होणमाने वैगेरे लोक हजर होते.*चौकट* :ताकारी योजना ही शेतकऱ्यांसाठी असून ती अधिकारी यांचे सोयीसाठी नाही. त्यामुळे अधिकारी यांचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही.. तसेच यासंदर्भात लवकरच *खासदार संजयकाका पाटील* साहेब यांना भेटून तांत्रिक विभाग चे कार्यालय सांगली येथे स्थलांतर केले आहे ते रद्द करावे व परत देवराष्ट्रे येथे सुरू करावे अशी मागणी करणार आहे असे सामाजिक कार्यकर्ते अँड. प्रमोद पाटील यांनी सांगितले.