४ वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला १९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

0
1572
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 

चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला (विश्वेश्वर) येथील ४ वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला १९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला (विश्वेश्वर) येथील आरोपी निलेश मनोहर खांडखुरे (२६) याने गावातीलच ४ वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवुन मंगळवारी आपल्या घरी बोलाविले. व आरोपीने चिमुकलीवर बलात्कार केला. या प्रकरणात चिमुकलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द कलम ३७६ (२) (आय) (जे) भादंवी सह ४, ८, १२ पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आरोपीला कुऱ्हा पोलीसांनी अमरावती न्यायालयात हजर केले असता आरोपीला १९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कुऱ्हा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नंदा वैश्य करीत आहे.