1972 S.S.C.बॕचच्या विद्यार्थी,विद्यार्थीनी मैत्र जीवाचे स्नेहसंमेलन धुमधडाक्यात: डॉ.डी.ए.चौगुले .

0
1326
Google search engine
Google search engine

महात्मा गांधी विद्यालय कडेगांव या हायस्कूल मध्ये आम्ही सर्वजण 11 वी S.S.C. पर्यंत शिकलो.या आमच्या मैत्र जीवाचे बॕचचे स्नेहसंमेलन त्याच हायस्कूल मध्ये धुमधडाक्यात पार पडले ..त्या दिवशी सकाळी 10 वाजता हायस्कूलवर गेलो .सार शांत वातावरण होत. 11वी.नंतर शिक्षणामुळे , नोकरी व प्रपंच या व्यापात कोणकुठे आहे हे माहित नव्हत .या स्नेहसंमेलना साठी आम्ही मित्र मैत्रीणी जवळजवळ साठजण एकत्र जमलो होतो.जवळ जवळ 46 वर्षे आणि 6 महिन्यानी आम्ही स्नेहसमेलना निमित्त प्रथमच भेटत होतो.एवढ्या वर्षानी आणि एवढ्या मोठ्या संख्येने स्नेहसंमेलन भरवणारी आमची 1972 ची पहिलीच पहिली बॕच ! काही मित्रानी ठिकठिकाणच्या मित्र मैत्रीणींचे फोन नं.मिळवले त्या सर्वाशी आम्ही संपर्क साधला .व स्नेहसमेलनास येण्याचे सांगितले. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळचे आमचे हायस्कूलचे शिक्षक श्री.शिंदे सर , श्री.यादव सर आले होते ;त्याच प्रमाणे आमचे सातवीचे गुरुजी श्री.पवार गुरुजी सुध्दा आले होते.कडेगाव हायस्कूलच्या मुख्याधिपीका मुल्ला मॕडमना पण बोलावल होत .त्याही आल्या होत्या.ग्राउंड वर आम्ही मोठ्या आनंदात आणि उत्साहात पाऊल ठेवले.त्या मातीशी त्या शाळेशी आमच एक जिव्हाळ्याच नात होत .एकएक मित्र येताच समाधान वाटत होत.आम्ही हाॕलमध्ये जमलो.आमचे शिक्षक येताच टाळ्यांच्या गजरात आम्ही त्यांच स्वागत केल. पून्हा एकदा आम्ही लहान झालो होतो.सर्व हाॕल भारला होता. 1972 सालानंतर एवढ्या वर्षानंतर आम्ही प्रथमच भेटत होतो. बर्याच जणाचे चेहरे ओळखत नव्हते नांवं आठवत नव्हती. एकमेकाना भेटण , नाव विचारण आणि ओळख पटवण चालू होत. ओळख पटताच आनंदाने गप्पा मारण ,ख्यालीखुशाली विचारण हे सर्वांच चालू होत. सगळ्या हाॕलभर आनंदाला उधाण आल होत. गुरुवर्य पण विद्यार्थ्याच्या बरोबर गप्पा मारत होते ,बालपणीच्या आठवणीत व गप्पात सारे मशगुल झाले होते.सोबत चहानाष्टापण चालू होता.नंतर आम्ही कार्यक्रमास सुरुवात केली. मान्यवरांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज , कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांंच्या प्रतिमाना पुष्पहार घालून व दीप प्रज्वलीत करुनकार्यक्रमाची सुरुवात केली. नंतर जे मित्र हयात नव्हते त्याना 2 मिनीट स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहिली.नंतर प्रत्येकजणाने आपला परिचय करुन दिला . कुटुंबाची माहिती दिली .सध्या काय करतात ते सांगितले. आम्ही सर्वजण लक्षपूर्वक ऐकत होतो. ऐकून समाधान वाटत होत.काही जण चांगले शिकले होते.नोकरीला होते.काहीजण व्यवसाय ,शेती करीत होते.कुणाची मुलेमुली मोठ्या पदावर होती तर कुणाची मुल परदेशात नोकरीला होती. प्रत्येकाने मैत्रीच नात जपल होत.नंतर श्री. शिंदेसर ,श्री. यादवसर आणि श्री. पवार गुरुजीं यांचा शाल श्रीफळ देऊन आम्ही सत्कार केला. श्रीमती मुल्ला मॕडम आमचे पी टी चे मुल्लासर यांच्या कन्या . सध्या म.गांधी हायस्कूल कडेगावच्या मुख्याधिपीका . त्याना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाला .त्यांचाही शालश्रीफळ देऊन बॕचमेंट महिलानी सत्कार केला. प्रत्येक वेळी टाळ्यांच्या कडकडाटात आनंद व्यक्त होत होता.नंतर मान्यवरांची भाषणे झाली.शिंदे सरानी आपले अनुभव सांगितले. ” एवढ्या वर्षानी तुम्ही एकत्र आलात .एकमेकावरील प्रेमा मुळे.तुमचे कौतुक करावे ते थोडे आहे. आपल्या वागण्याचा आदर्श इतरापुढे असू द्या . मी जीवनात कुठल्याही आमिषाला अथवा दंडेलशाहीला बळी पडलो नाही .आदर्श शिक्षकआदर्श शिक्षण सेवक म्हणून माझा पुष्कळ वेळा सत्कार झाला.त्यापेक्षा माझे विद्यार्थी सर्व क्षेत्रात उच्च पदावर आहेत या गोष्टीचा मला जास्त आनंद आहे.आणि त्यांचे पाय अजूनही जमीनीवर आहेत हे मी माझे शिक्षणाचे कृतार्थपण समजतोतुमचे प्रेम पाहून मी भाराऊन गेलो आहे.”यादवसर म्हणाले ,”मुलानो माणूसपण जपणे महत्वाचे आहे.तुम्ही व तुमच्या मुलानी किती गाड्या व बंगले घेतले त्यापेक्षा तुमची मुले तुम्हाला किती जपतात , तुम्ही नातवंडाबरोबर किती खेळता व ती किती सुसंस्कृत आहेत हे महत्वाच आहे.तुम्ही आनंदी रहा दुसर्याना आनंदी ठेवा. मैत्री जपा.मैत्री वाढवा.विचारांची देवाणघेवाण करा.संबंध वृध्दींगत करा .” खरच दोघानी मोलाच मार्गदर्शन केल.महात्मा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एन ए. मुल्लामॕडम आपल्या भाषणात म्हणाल्या”तुमच्या 72 च्या बॕचने मोठ्या धुमधडाक्यात गेटटुगेदर केले आहे.एवढ्या वर्षानी अशी धमाल कोणत्याही बॕचने केलेली नाही. बर्याच बॕचचे विद्यार्थी सांगतात आम्हाला ह्या तारखेला गेटटुगेदर घ्यायच आहे पण त्या दिवशी कुणीही येत नाही. डाॕक्टरांची मिसेस मंदा माझी क्लासमेट .त्यांचा गेटटुगेदर संबंधी फोन आला तेव्हाच मला खात्री पटली . कारण जूनमध्ये पण तुम्ही स्नेहसंमेलन केले आहे.तुमचा एकमेकाविषयीचा स्नेह पाहून आनंद झाला”..त्यानी मुल्लासरांच्या आठवणी सांगितल्या.विद्यार्थ्याना सर कसे मदत करीत ते सांगितले.त्यानी 1972 च्या बॕचची तारीफ केली.सौ.लताचे मिस्टर श्री. कृष्णराव म्हणाले ,” 1972 च्या बॕचच कौतुक कराव तेव्हढ थोड आहे. माझी मिसेस लता .तिने याना भेटायला बोलावल आणि 10/12 मित्र मैत्रिणी 7 आक्टोबरला कोल्हापूरला घरी भेटायला धाऊन आले .46 वर्षानी सर्व भेटले. भरपूर गप्पा मारल्या. आमची सर्व फॕमिली खुष झाली. सर्व मिळून जेवलो. हे येऊन गेल्यामुळे लताला इतक बर वाटल की स्वतःची कामे स्वतः करु लागली. नाहीतर तिला हाताला धरुन बेडवरुन ऊठवायला लागायच .आज ती आनंदाने आणि उत्साहाने गेटटुगेदरला आली आहे .यांची खरीखुरी मैत्री ! या सर्वाना धन्यवाद “. खरच मैत्रीच नात जीवाभावाच असत .मनाला उभारी देणार असत . आम्ही भेटल्यामुळे लतात नवा उत्साह आला होता. तिचे मनोबल वाढले होते.आमची बॕचमेट शिला तिखे हिचा वाढदिवस. तो आम्ही सर्वानी केक कापून साजरा केला. हॕपी बर्थडेच गाण श्री.सज्जनने म्हटल. हॕपी बर्थडे च्या स्वरानी आणि टाळ्यानी सारा हाॕल दुमदुमला. सगळ्याना उत्साह आला होता.आनंद झाला होता. शिला तिखे तर आनंदाने फुलून गेली होती.,आमचा गेटटुगेदर आमचा फ्रेंडशिपडे आणि बॕचमेटचा हॕपी बर्थ डे जणू सगळ्या आनंदी दिवसांचा सोहळा ,आमच्यासाठी महोत्सव होता.एवढ्या वर्षानी बालपणापासूनच्या मित्र मैत्रीणींच्या आणि शिक्षकांच्या सोबत वाढदिवस साजरा होणारी तिच्यासारखी भाग्यवंत तीच .तिने प्रत्येकाला आमच्या 1972 च्या निरोप समारंभाच्या वेळी काढलेल्या फोटोची काॕपी प्रेझेंट दिली. ती एक आविस्मरणिय भेट आहे .शेवटी जेवणाचा प्रोग्राम गप्पागोष्टी करीत मस्त झाला . पुढल्यावेळी भेटायच अस आश्वासन एकमेकांना देऊन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला .असे आमचे स्नेहसंमेलन पार पडले.हे स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी शिला तिखे,शोभा सुपले,कृष्णत साळुंखे,दत्तात्रय पाठक,आनंदा माळी,हणमंत रेणुशे, डॉ.धोंडीराम चौगुले,दिलीप खांबे व सर्व मित्र मंडळीनी पुष्कळ मेहनत घेतली.आभार शामराव गाढवे यांनी मानले.