औरंगाबाद येथे ६६ व्या राज्यस्तरीय कामगार नाट्य स्पर्धा २७ जानेवारीपासून सुरुवात

0
1125
Google search engine
Google search engine

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अकोला विभागाचा सहभाग

परळी,नितीन ढाकणे दिपक गित्ते  :

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय ६६ व्या कामगार नाट्य स्पर्धांचे अंतिम फेरीच्या नाट्य स्पर्धा औरंगाबाद येथे होत आहे. कामगार मंडळाच्या कामगार नाट्य स्पर्धांचा हा ६६ वा वर्षे आहे. यावर्षीच्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा आयोजनाचा बहुमान मराठवाडा विभागाला मिळाला आहे.
या स्पर्धा २७ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान औरंगाबाद येथील तापडिया नाट्यमंदिर येथे दररोज सायंकाळी ७ वाजता होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार अतुल सावे, ज्येष्ठ सिने दिग्दर्शक देवदत्त म्हात्रे, कल्याण आयुक्त सतीश दाभाडे, बजाज ऑटोचे अभय पत्की, सहाय्यक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अकोला या विभागातील १८ नाट्य संघ या स्पर्धेत नाटके सादर करणार असून प्रवेश विनामूल्य आहे.
नाट्य स्पर्धेत दर्जेदार नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार असून परळी व परिसरातील नाट्यप्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन औरंगाबाद विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे व केंद्र संचालक आरेफ शेख यांनी केले आहे.

राज्यस्तरीय कामगार नाट्य स्पर्धेत सादर
होणारी नाटके

तारीख – नाटकाचे नाव – लेखकाचे नाव – सादरकर्ते

२७ जानेवारी – पा ऊस पाडया – आदिल शेख – औरंगाबाद
२८ जानेवारी – सांबरी , शैलेश गोजमगुंडे – जळगाव
२९ जानेवारी – इशारे निखारे – राजदत्त तांबे – ठाणे
३०जानेवारी – चिमणीचे घर होते मेणाचे- विजय तेंडुलकर- मुंबई
३१ जानेवारी – मोमोज – चंद्रकांत शिंदे – अमरावती
१ फेब्रुवारी – फतवा -सलीम शेख- नागपूर
३ फेब्रुवारी – एक्झिट – अरविंद लिमये – नागपुर
४ फेब्रुवारी – नथिंग टू से – प्रल्हाद वाणी – चंद्रपूर
५ फेब्रुवारी – फैंट – चैतन्य सरदेशपांडे – उल्हासनगर
६ फेब्रुवारी – वारूळ – राजेंद्र पोळ- अकोला
७ फेब्रुवारी – समाज सुधारक मित्र मंडळ- संतोष माकुडे -पुणे
८ फेब्रुवारी- डोंगरार्त – अपर्णा क्षेमकल्याणी- नागपुर
९ फेब्रुवारी – त्रिकोणमिती – प्रकाश पवार- मुंबई
१० फेब्रुवारी – र्‍हासपर्व – विद्यासागर अध्यापक- कोल्हापूर
११ फेब्रुवारी – आधारशिला – मुकुंद कुलकर्णी – नाशिक
१२ फेब्रुवारी – बाल बाल नही बचे- प्रशांत जोशी- चीपळून
१३ फेब्रुवारी – खिडक्या – रविशंकर झिंगरे- नांदेड
१४ फेब्रुवारी – दैवम अचिन्त्यम – आनंद खरबस – सोलापूर