कोंडमधील अवैद्य दारु विक्री बंद करा ; अन्यथा मोफत दारु विक्री केंद्र सुरु करणार

0
1404
Google search engine
Google search engine

कोंडमधील अवैद्य दारु विक्री बंद करा ; अन्यथा मोफत खुलेआम दारु विक्री केंद्र सुरु करणार

उस्मानाबाद / प्रतिनिधी – उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथे गेल्या पंधरवाड्यापासून दारुबंदी समीतीची नेमणुक केल्यापासून काहि ठिकाणची अवैद्य दारू विक्री बंद झाली आहे .परंतू काही ठिकाणी दारुविक्रेत्यांची दिवसढवळ्या खुलेआम दारु विक्री सुरु आहे.त्यामुळे संबंधित दारुविक्री करणार्यांची येवढी मुजोरी कशी वाढली असेल ? यांना कोणाचे अभय आहे? संबंधीत दारु विक्रेत्यावर जर पोलिस विभाग ,दारु बंदी विभाग,एल सी बी ( स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग उस्मानाबाद ) यांनी जर चार दिवसात कार्यवाही नाही केली तर कोंड येथील भर चौकात बस स्थानक परिसरात मोफत हातभट्टी दारुचे दारु विक्री केंद्र खुले दुकान चालू करणार असल्याचा इशारा कोंड येथील गाव दारू बंदी समीतीच्या वातीने इशारा देण्यात येणार आसल्याची माहीती समीतीच्या पदाधीकार्यांनी दिली आहे.