प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे — इंजि. पवन दवंडे नरखेड तालुक्यात खंजेरीच्या माध्यमातून जनजागृती !  इंजि. पवन  दवंडे यांची भीषण दुष्काळावर गरजली खंजेरी ! 

0
838
Google search engine
Google search engine
प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे — इंजि. पवन दवंडे
नरखेड तालुक्यात खंजेरीच्या माध्यमातून जनजागृती !
इंजि. पवन दवंडे यांची भीषण दुष्काळावर गरजली खंजेरी !

विशेष प्रतिनिधी /

नरखेड तालुक्यामध्ये लोहारी सावंगा परिसरामध्ये मकर संक्रांतिनिमित्य राष्ट्रीय कीर्तनाचे सतत २१ वर्षांपासून आयोजन होत आहे , त्यामध्ये सप्त खंजेरीच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , त्यामध्ये पवन दवंडे यांनी भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी पाण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लोकचळवळ उभी करून नरखेड तालुक्यात पानी फाउंडेशनच्या माध्यमातून शाश्वत पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

दुष्काळमुक्तीसाठी लोकांच्या सहकार्याने पानी फाउंडेशनने सुरु केलेली सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा आपल्या नरखेड तालुक्याचा कायापालट करणारी ठरणारी आहे. यंदा या स्पर्धेत जास्तीतजास्त लोकांनी सहभागी होऊन राज्यात नागपूर जिल्ह्यातील नारखेड तालुक्याची पाणीदार तालुका म्हणून नवीन ओळख निर्माण करावी, असे आवाहन खंजेरीच्या माध्यमातून इंजि. पावन दवंडे यांनी केले. नरखेड तालुक्यामध्ये पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा-४ सन – २०१९ ची तयारी सुरू झाली असून हजारो युवकांनी आपले गाव पाणीदार व समृद्ध करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सप्तखंजेरी वादक इंजि पवन दवंडे यांनी केले .

सन २०१९ या वर्षाकरीता सलग दुसऱ्या वर्षीही नरखेड तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत युवक , शालेय व महाविद्यालयीन विदयार्थ्यांनी सहभागी होऊन जलक्रांती घडवावी . यामुळे मोठया प्रमाणात जलसंधारणाची कामे होऊन पाणी साठे निर्माण होतील. पाणी फाउंडेशनने जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देऊन राज्यात एक नवी लोकचळवळ निर्माण केली. सर्व भेद विसरुन लोक एकत्र आले तर नक्कीच गावागावांमध्ये जलसंधारणाची अनेक कामे होऊन त्यामध्ये पाणी खेळू लागले.

पानी फाउंडेशनच्या माध्यमातून ‘गाव हे आपुलं, आपण सारे, मिळुनी सुंदर करायचं झालं गेलं ते विसरून सारं गावाचा विकास करायचं’ या कवितेच्या पंक्‍तीनुसार गावातील राजकारण गट-तट, जाती-पाती मतभेद गावाच्या उंच डोंगरावर ठेवून गाव पाणीदार व राज्य दुष्काळमुक्‍त करण्यासाठी झपाटलेले आहेत.

नरखेड तालुक्यात वॉटरकप स्पर्धेसाठी लोकांचा चांगला सहभाग मिळत आहे. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपले गाव पाणीदार करावे. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून वॉटरकप स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन पवन दवंडे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना केले त्यावेळी पानी फाउंडेशनचे तालुका समन्वयक रुपेश वाळके , हेमंत पिकलमुंडे , भूषण सूर्यवंशी व पाणी फाउंडेशन टीम, तालुक्यातील हजारो गावकरी व युवक मंडळी उपस्थित होती .