आमदार राहुल मोटेंच्या पत्नी वैशाली मोटेंच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सरकारी यंत्रणा

547
जाहिरात

दि.२४ रोजी आमदार राहूल मोटे यांच्या पत्नी वैशाली ताई मोटे यांच्या हळदी कुंकवाला गर्दी भरपूर दिसावी यासाठी शासकीय यंत्रणाच वापरली यामध्ये एकात्मीक बालविकास प्रकल्प ( अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस) संपुर्ण तसेच आशा कार्यकर्ती व त्याच्यां पर्यवेक्षीका तसेच भूम तालुक्यातील महिला बचत गटांना पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांऱ्या मार्फत तोंडी आदेश देऊन महिलांची गर्दी होण्यासाठी हा सर्व आटापिटा आमदार राहूल मोटे यांच्या पत्नीच्या कार्याक्रमासाठी बोलवण्यात आले होते. यामध्ये पंचायत समितीनेही चुक केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. अतिशय विचार पुर्वक नियोजन करून ही कर्मचाऱ्यांची शुध्द फसवणूक केली आहे.बैठका किंवा कार्यक्रम च घ्यायचा होता तर पंचायत समितीच्या सभागृहात का घेतला नाही तो रविंन्द्र हायस्कूलच का निवडले यामध्ये राजकारण करण्यात आले आहे. सकाळी दहा ते रात्री साडेसहा वाजे पर्यंत महिलांना बसून ठेवण्यात आले. राजकीय पोळी भाजण्यासाठी हा सर्व उठाठेवा करण्यात आला असल्याची सर्व महिला वर्गात व तालुक्यात याची चर्चा रंगत आहे. याची दखल सोशल मिडियाने घ्यावी.अशा स्वरुपाचा संदेश सध्या सोशल मिडियावर फिरत आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।