आकोट येथे गीता भागवत सत्संग

0
730
Google search engine
Google search engine

आकोट/ ता.प्रतीनिधी

श्री योग वेदांत सेवा समिती आकोट च्या वतीने येथे दोन दिवस दिव्य गीता भागवत सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. कथा प्रवक्त्या सुश्री लिनादिदी ह्या राहणार आहेत. आकोट येथील माहेश्वरी भवन येथे 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता गीता भागवत सत्संग होणार आहे. यामध्ये पुज्य बापुजी यांच्या सत्शिष्या सुश्री लिनादिदी या कथा प्रवक्त्या राहणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान यौगिक क्रिया व स्वास्थ्य विषयक माहिती देण्यात येणार आहे. तसेच 1 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता मातृपितृ पूजन कार्यक्रम होईल. आयोजीत सत्संगाचा साधक व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री योग वेदांत सेवा समिती आकोट च्या वतीने करण्यात आले आहे.