सेवेतल्या आनंदाने जीवन फुलून जाते –
माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे
आकोट/ता.प्रतीनिधी
अलिकडे नोकरी मिळणं दुरापास्त झाले आहे.ज्यांना मिळाली त्यांनी या संधीचं सोनं करावे.सेवा कर्तव्य निष्ठेने पार पाडावी. सेवेतला आनंद जीवन फुलवून टाकते.हा आनंद उपभोगणारे धन्य आहेत असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांनी केले.
नगरपरिषद सार्वजनिक वाचनालयाचे कर्तव्यनिष्ठ कर्मचारी नारायणराव पतिंगे यांचे सेवानिवृती बद्दल आयोजित निरोप समारंभात पुरुषोत्तम चौखंडे बोलत होते.त्यांनी नारायणराव पतिंगे यांचे कार्याचा गौरव केला.
शिक्षण विभाग कार्यालयात आयोजित निरोप व सत्कार समारंभात नारायणराव पतिंगे यांचा सपत्निक भावपूर्ण सत्कार यावेळी पार पडला.
याप्रसंगी शिक्षण सभापती शशिकला गायगोले,नगरसेवक विवेक बोचे,शिक्षण प्रशासन अधिकारी नंदकिशोर हिंगणकर ,कार्यालयीन अधिक्षक गौरव लोंदे,जेष्ठ वाचक विनायकराव मोडसे,श्रीकांत गायगोले,पत्रकार संतोष विणके, उपस्थित होते.
नगर परिषद वाचनालय वाचक संघ,न प कर्मचारी सहकारी पतसंस्था व कर्मचारी संघटना यांचे वतीने नारायण पतिंगे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विवेक बोचे,नंदकिशोर हिंगणकर ,राहुल सपकाळ यांनी नारायणराव पतिंगे यांच्या सेवेचा गौरव करणारी समायोचित भाषणे झालीत.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल संजय बेलुरकर यांनी केले.
कार्यक्रमाला आरोग्य निरिक्षक सरफराज खान,मोहन नाथे,सुरेंद्र सोनोने,विजय रताळे,रघुनाथ बेराड,प्रविण धर्माळे,गजानन बोंद्रे,भिमराव तेलगोटे,आवटे साहेब,वासुदेव काळे,ऋषीकेष तायडे,तन्वीर,विनोद तेलगोटे,नितिन हाडोळे,इंगळे
व वाचक व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.