जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहरचा मृत्यू झाल्याचा प्रसारमाध्यमांचा दावा – पाक किंवा भारत यांच्याकडून दुजोरा नाही

1790

नवी देहली – जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहर याचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांकडून प्रसारित करण्यात आले आहे. या वृत्ताला पाक किंवा भारत यांच्याकडून मात्र दुजोरा देण्यात आला नसल्याचेही म्हटले आहे. भारताने २६ फेब्रुवारीला पाकच्या बालाकोट येथील जैशच्या प्रशिक्षण केंद्रावर केेलेल्या आक्रमणात तो ठार झाल्याचे म्हटले जात आहे. पाकचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी २ दिवसांपूर्वीच, ‘मसूद गंभीररित्या आजारी असून तो बाहेरही पडू शकत नाही’, असे सांगितले होते. मसूद पाकच्या रावळपिंडी येथील सैनिक रुग्णालयात उपचार घेत असल्याचे आणि त्याचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे सांगण्यात आले होते.

जाहिरात
Previous articleपरळी वैद्यनाथ नगरी भाविकांनी आणि विद्युत रोषणाईनी झाली तेजोमय
Next articleजिल्हाप्रशासनची धडक मोहिम का नाही?तालुक्यातील अवैध गौण खनिजाचे उत्खनन आणि वाहतूक थांबलेली नाही..