अत्याचारी प्रवृत्तीविरोधात लढा लढण्यासाठी शिवरायांचा इतिहास प्रेरणादायी आहे – शिवव्याख्याते ओंकार औंधे

Google search engine
Google search engine

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाच्या माध्यमातून आपल्याला अत्याचारी प्रवृतिविरोधात लढण्याची प्रेरणा मिळते असे मत शिवव्याख्याते ओंकार औंधे यांनी लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय कडेगांव येथे राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व यशस्वी विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात व्यक्त केले .यावेळी बोलत असताना औंधे पुढे म्हणाले की ,आज समाजात सर्वत्र शिवजयंती साजरी करत असताना डीजे – डॉल्बी ,फटाके ,विद्युत रोषणाई अशा अनावश्यक गोष्टींसाठी पैसा खर्च केला जातो परंतु याच्यातून शिवरायांचा कोणता विचार आत्मसात केला याचे उत्तर मात्र मिळत नाही म्हणून शिवजयंती साजरी करत असताना आज शिवरायांचे गड किल्ले वाचवण्यासाठी या पैशांचा वापर केला पाहिजे व आपल्या स्वराज्याच्या इतिहासाचे साक्षीदार असणारे गड किल्ले यांचे सवर्धन केले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी मांडले.तसेच ते बोलताना म्हणाले की,आज दुष्काळ या सारख्या समस्येवरती मात करण्यासाठी शिवरायांच्या जलनितीचा मार्ग अवलंबला पाहिजे आणि तरच या सारख्या समस्या मुक्त म्हणून आदर्शवादी महाराष्ट्र घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शिवरायांनी आपल्या स्वराज्याचा राज्यकारभार हा मराठी भाषेतून केला आणि या मराठी भाषेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या पराक्रमाचा इतिहास सर्वसामान्य लोकांना समजला .तीच मराठी भाषा आज नाहीशी होत आहे म्हणून आता मराठी भाषा वाचवण्यासाठी चलवळ उभारली पाहजे तरच आपला इतिहास जिवंत राहील .यावेळी या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विशाल मोरे यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सावंत सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी प्रा. व्ही डी पाटील,प्रा. माने ,प्रा. प्रताप पाटील व शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते .