सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 : नाम निर्देशन अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी एक दिवस आधी निवडणूक खर्चाकरिता स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

Google search engine
Google search engine

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग यांच्या दिनांक 15 ऑक्टोबर 2013 च्या पत्रातील निर्देशान्वये 44-सांगली लोकसभा मतदार संघामध्ये निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी निवडणूक नाम निर्देशन अर्ज दाखल करण्यापूर्वी एक दिवस आधी निवडणूक खर्चाकरिता स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा 44-सांगली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, निवडणूक नामनिर्देशन दाखल करतेवेळी करण्यात येणारा आवेदन शुल्क, अनामत रक्कम, प्रतिज्ञापत्र व इतर अनुषंगीक बाबीवर होणारा खर्च निवडणूक कार्यासाठी उघडण्यात येणाऱ्या स्वतंत्र बँक खात्यातून होणे आवश्यक आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी निवडणूक कार्यासाठी राष्ट्रीयकृत बँक / शेड्यूल बँक / सहकारी बँक इत्यादी बँकेमध्ये नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यापूर्वी एक दिवस आधी खाते उघडून कार्यान्वित करून घ्यावे. याबाबत इच्छुक उमेदवारांना काही समस्या अथवा अडचणी असल्यास जिल्हा खर्च सनियंत्रण नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर यांच्याशी 9004930459 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.