कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे वेतन देणार – उप आयुक्त दिपक पुजारी

0
1066
Google search engine
Google search engine

भाईंदर. (प्रतिनिधी) – कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे वेतन दिले जाईल अशी ग्वाही उप आयुक्त दिपक पुजारी यांनी म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांना दिली आहे. यावेळी मुलाणी यांनी मिरा भाईंदर मनपा आयुक्त बालाजी खतगांवकर यांना व उप आयुक्त मुख्यालय दिपक पुजारी यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

दरम्यान आयुक्तांनी पत्र वर्ग केले असता अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन अदा कारावाच्या देयकांची कार्यपद्धती विहित करण्यासाठी शासन परिपत्रकाचे कटाक्षाने पालन करावे असे नमूद करत कार्यालयीन परिपत्रक उपायुक्त मुख्यालय, मुख्य लेखाधिकारी, मुख्य लेखा परीक्षक, आस्थापना विभाग सहित सर्व विभाग सूचना दिल्या आहेत.

म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी म्हणाले की, कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन आदा करावयाच्या देयकांची कार्यपद्धती विहित करण्याबाबत राज्य शासनाने दि. 22 फेब्रुवारी 2019 रोजी शासन परिपत्रक जारी केला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना 01) मूळ वेतन, 02) विशेष/ महागाई भत्ता, 03) घरभाडे भत्ता, 04) इतर भत्ते, 05) भविष्य निर्वाह निधी (P.F.), 06) राज्य कामगार विमा योजना (ESIS) / कर्मचारी नुकसान भरपाई (W.C.), 07) व्यावसायिक कर (P.T.), 08) बोनस, 09) कामगार कल्याण निधी, 10) सुट्यांच्या दिवशी केलेले काम इ. अनुज्ञेयतेनुसार संबंधित कर्मचाऱ्याच्या बँक खात्यामध्ये वेतन जमा करण्यात यावे असे नमूद आहे. त्यानुषंगाने मिरा भाईंदर महानगरपालिकेत असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचारी यांना राज्य शासने जारी केलेले शासन परिपत्रक लागू करण्याची लेखी मागणी मिरा भाईंदर मनपा आयुक्त बालाजी खतगांवकर व उप आयुक्त मुख्यालय दिपक पुजारी यांना केली असता पुजारी म्हणाले की, आज समाजात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर उच्च शिक्षित होत आहे. परंतु, नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे मिळेल तेथे तरुण वर्ग काम करत आहे. कंत्राटी कर्मचारी हा महानगरपालिकेच्या भरपूर उपयोगी येत आहे. कंत्राटी कर्मचारी हा उत्तम काम करत असून कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन परिपत्रकाप्रमाणे वेतन प्राप्तीची हमी दिली जाईल, असे पुजारी म्हणाले.