वर्धा लोकसभेसाठी १६ उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल – छाननीमध्ये सर्वच उमेदवारांचे अर्ज ठरले वैध

0
676
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान.) 
      वर्धा लोकसभा निवडणूकीसाठी एकुण १६ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामदास तडस यांचेसह वंचित बहुन आघाडी, लोकजागर पार्टी, बहुजन समाज पार्टी, इंडियन युनियन मुस्लीम लिग या पक्षाच्या उमेदवारासहित शेवटच्या दिवशी  एकुण ११ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केल्यामुळे नामाकंन दाखल करणा-या उमेदवारांची एकुण संख्या १६ झाली असुन मंगळवारी झालेल्या अर्ज छाननीमध्ये सर्वच अर्ज वैध ठरले आहे.
            २० मार्चला भास्कर नेवारे यांनी अपक्ष म्हणुन अर्ज दाखल केला. २२ मार्च ला  नामांकन दाखल करणा-यामध्ये  प्रविण गाढवे आंबेडकरवादी रिपब्लीकन पार्टी,  रागेश्वर बालपांडे अपक्ष, अरविंद लिल्होरे अपक्ष, चारुलता टोकस भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस यांनी तीन नामांकन तर रामदास तडस भाजपा यांनी दोन नामांकन अर्ज दाखल केले. तर शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामदास तडस यांनी पुन्हा 2 अर्ज सादर केले. इंडियन युनियन मुस्लीम लिगचे मो. इमरान मो.याकुब यांनी पक्ष आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. वंचित बहुजन आघाडीचे वतीने धनराज वंजारी, बहुजन समाज पार्टी शैलेशकुमार अग्रवाल, ज्ञानेश वाकुडकर यांनी लोकजागर पार्टी साठी , नंदकिशोर सागर (मोरे) -अपक्ष्, झित्रुजी बोरुटकर -अपक्ष, गणेश लादे -आंबेडकर पार्टी ऑफ इंडिया, मोहन राईकवार –अपक्ष, जगदिश वानखडे – बहुजन मुक्ती पार्टी आणि उमेश नेवारे यांनी –अपक्ष  उमेदवार म्हणुन नामांकन अर्ज दाखल केले. काल २६ मार्च ला अर्जाची छाननी झाली. सर्वच अर्ज वैध ठरले असुन एकही अर्ज बाद झालेला नाही. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम दिनांक उद्याची २८ मार्च आहे. व २९ मार्च ला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होणार आहे.