मॅथ्यस ओलंपियाड परीक्षेत सेदानी इंग्लिश स्कूलचे दणदणीत यश

0
702
Google search engine
Google search engine

90 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल

अकोट/ प्रतिनिधी
मॅथस ओलंपियाड परीक्षेत स्थानिक दिवालीबेन सेदानी इंग्लिश स्कुलचा १००% टक्के निकाल लागला असून शाळेच्या 90 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल सह सिल्वर व ब्राॕंझ मेडल मिळवत नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

ही परीक्षा शाळेतील एकुण १०७ विद्यार्थ्यांनी दीली होती त्यापैकी 90 मुलांना गोल्ड मॅडल 10 मुलांना सिल्वर मेडल नऊ विद्यार्थ्यांना ब्राँझ मेडल मिळाले या यशाचे श्रेय
संस्थाध्यक्ष स्मिता सेदानी मॅडम प्रिन्सिपल विजय भागवतकर परीक्षा प्रमुख नितीन भास्कर सर ,किशोर रेखाते सर व शिक्षक वृंदाना यांना देण्यात येते