यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात महात्मा फुले जयंती साजरी

0
1392
Google search engine
Google search engine

नाशिक – येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमात विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच महात्मा फुले यांच्या जीवन कार्यास उजाळा देण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे मा. कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्यासह विद्यापीठातील संचालक, प्राध्यापक, अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.