तळेगाव दशासरच्या काँग्रेस जि. प. सदस्या पतीसह अँटी करप्शनच्या जाळ्यात – १० हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात अटक

0
3694
Google search engine
Google search engine

 

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)

स्थानिक अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेजवळील तळेगाव दशासर येथील काँग्रेसच्या महिला जिल्हा परिषद सदस्या व त्यांचे पती यांना १० हजार रुपयांची लाच घेतांना बुधवारी अमरावती येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केल्याची घटना दुपारी घडली. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सौ. अनिता राजु मेश्राम व त्यांचे पती श्री राजू एकनाथ मेश्राम हे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार यांचा लाकुड तोडून विक्री करण्याचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी तळेगाव दशासर येथील तलावाचे भिंतीवरील छाटलेल्या बाभळीच्या झाडामुळे त्यांचे विरूध्द तक्रार न करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या अनिता मेश्राम यांनी तक्रारदार यांना १५ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तड जोडीअंती दहा हजार रूपये लाच स्विकारण्याचे मान्य केले होते. मात्र तक्रारदाराने याबाबत सदर तक्रार अमरावतीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यामुळे एसीबीने यशस्वी सापडा रचत कारवाई केली. दरम्यान दहा हजारांची लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारून आरोपी राजू मेश्राम ला दिली. दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असुन दोघांना अटक करण्यात आली आहे. सदर महिला जिल्हा परिषद सदस्या ह्या काँग्रेस पक्षाच्या असून या कारवाईमुळे जिल्हात चांगलीच खळबळ उडाली आहे.