पदविधर अंशकालीन कर्मचारी यांची उद्या अमरावती येथे महत्वपूर्ण बैठक

0
1153
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)
राज्य शासनाच्या प्रशासकीय अधिकारी असीम गुप्ता व एस .बि. मांडवे, कौशल्य विकास व उद्योगजकता विभाग मंत्रालय मुंबई यांच्या सहीने महाराष्ट्रातील १८६४४ पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना शासनाच्या अधिपत्त्याखाली कंत्राटी तत्वावर पदभर्ती करण्याबाबत २ मार्च २०१९ रोजी प्रशासकीय अधिकारी यांनी शासन परिपत्रक काढले. मात्र १० मार्च २०१९ ला लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता लागल्याने शासन परिपत्रकाची अंमलबजावनी केल्या गेली नाही. आज शासन अध्यादेश परिपत्रक काढून जवळपास 2  महीण्याचा कालावधी होत आहे. करीता शासनाच्या सर्व विभागामार्फत २ मार्च २०१९ च्या शासन परिपत्रकाची अंमलबजावनी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे १ मे २०१९ ला महाराष्ट्र दिन व जागतीक कामगार दिनी करण्यात येणाऱ्या बेमुदत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी उद्या शुक्रवार २६ एप्रिलला दुपारी १२ वाजता अमरावती येथील मालटेकडी येथे महत्वपूर्ण बैठक आयोजीत केलेली आहे .
   करीता अमरावती जिल्ह्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांनी  न चुकता मिंटीगला उपस्थित राहण्याचे आवाहन प.अं.क. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल वरघट व संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री जयंत नादुंरकर, संतोष पाठक, सतीश डोगंरे, नाना डेरे, भारती फुटाने, अनिता वानखडे, मिना डेहणीकर, ज्योती माहुरे, माया सहारे, सुरेखा ठाकरे, ज्योती खेसे, उज्वला वासनकर, अंजली लोहकरे, अर्चना पाटिल, रजनी लहाबर, प्रतिभा वायकर, शिला अर्डक, सुरेश हिरपुरकर, दगडकर, चव्हान, कांबळे, विलास बोबडे, प्रशांत डहाके, राजेन्द्र चिमोटे, विलास सोनोने, आशिष पांडे, छोटू बहाद्रपुरे, गजानन सुरोसे, नितीन पुंड, सुदाम तरास, गजानन ठाकरे, सुधाकर डहाके,  ओमप्रकाश चवरे, धारपवार, किशोर घोडेस्वार, रामटेके, दिलीप लकडे, यशवंत चव्हान, तुलशिदास पाचघरे, राजेश पिहुल, गजानन चंदनकर, सुनिल कवाने, देवेंद्र कानडे , लता निरगुडे , सुनिता फुले, रजनी डाखोरे, संध्या निलटकर, सुनिल दुर्गे, रविन्द्र रावेकर, रविन्द्र कनसे, प्रविन खंडारे, रंजना वासनिक, राजेश्री मानेकर, मिना इंगोले, अॅड. प्रिया भगत यांनी केले.